लावा आयरिस फ्युल F1 स्मार्टफोन लाँच, किंमत ८,७०० रुपये

HIGHLIGHTS

हा स्मार्टफोन १.३GHz क्वाड-कोर प्रोसेसर आणि २जीबी रॅमने सुसज्ज आहे. ह्या स्मार्टफोनमध्ये ८जीबीचे अंतर्गत स्टोरेज समाविष्ट आहे, ज्याला मायक्रो-एसडी कार्डच्या साहाय्याने ३२ जीबीपर्यंत वाढवता येऊ शकते.

लावा आयरिस फ्युल F1 स्मार्टफोन लाँच, किंमत ८,७०० रुपये

मोबाईल निर्माता कंपनी लावाने आपला नवीन स्मार्टफोन आयरिस फ्यूल F1 लाँच केला आहे. ह्याला कंपनीच्या वेबसाइटवर किंमतीसह यादीत जोडले आहे. ह्या नवीन स्मार्टफोनची किंमत ८,७०० रुपये ठेवण्यात आली आहे. ह्या नवीन स्मार्टफोनला आयरिस फ्यूल F1 मिनीचे अपग्रेडेड व्हर्जन सांगितले जातेय.

Digit.in Survey
✅ Thank you for completing the survey!

 

ह्याच्या वैशिष्ट्यांविषयी बोलायचे झाले तर, ह्यात ५ इंचाची FWVGA IPS डिस्प्ले दिली गेली आहे, ज्याचे रिझोल्युशन ४८०x८५४ पिक्सेल आहे. ह्याच्या डिस्प्लेची पिक्सेल तीव्रता १९६ppi आहे. त्याचबरोबर हा स्मार्टफोन १.३GHz  क्वाड-कोर प्रोसेसर आणि २जीबी रॅमने सुसज्ज आहे. ह्या स्मार्टफोनमध्ये ८जीबीचे अंतर्गत स्टोरेजसुद्धा दिले आहे,ज्याला मायक्रो-एसडी कार्डच्या साहाय्याने ३२जीबीपर्यंत वाढवले जाऊ शकते.

त्याशिवाय ह्या स्मार्टफोनमध्ये ८ मेगापिक्सेलचा रियर कॅमेरा आणि २ मेगापिक्सेलचा फ्रंट फेसिंग कॅमेरासुद्धा दिला आहे. हा स्मार्टफोन अॅनड्रॉईड ५.१ लॉलीपॉपवर ऑपरेटिंग सिस्टमवर चालतो. हा स्मार्टफोन ४०००mAh बॅटरीने सुसज्ज आहे.

ह्या हँडसेटचा आकार १४१x७२x९.५mm आहे. आणि ह्याचे वजन १४८ ग्रॅम आहे. ह्याच्या  कनेक्टिव्हिटीबद्दल बोलायचे झाले तर हा 3G(HSPA+), वायफाय ८०२.११ B/G/N, ब्लूटूथ ४.०, मायक्रो-USB 2.0, GPS/A-GPS आणि ३.५mm च्या ऑडियो जॅकने सुसज्ज आहे. तसेच ह्यात एक्लेलेरोमीटर, एंबियंट लाइट सेंसर आणि प्रॉक्सिमिटी सेंसरसुद्धा आहेत.

Digit NewsDesk

Digit NewsDesk

Digit News Desk writes news stories across a range of topics. Getting you news updates on the latest in the world of tech. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo