Lava चा बोल्ड स्मार्टफोन लवकरच भारतात होणार लाँच, 10,000 रुपयांच्या बजेटमध्ये मिळतील जबरदस्त फीचर्स
Lava येत्या आठवड्यात रोजी भारतात LAVA Bold 5G लाँच करणार आहे.
Lava ने Amazon लिस्टिंगवरून या फोनच्या लाँचची तारीख जाहीर केली आहे.
स्पेशल लाँच ऑफर अंतर्गत हा फोन 10,499 रुपयांमध्ये खरेदी करता येईल.
एकमेव देशी कंपनी Lava चा आगामी स्मार्टफोन भारतीय बाजारात लाँच होण्यासाठी सज्ज झाला आहे. Lava आता एक नवीन स्मार्टफोन घेऊन येत आहे, जो स्वस्त मोबाईल फोन वापरणाऱ्यांना आवडणार आहे. आम्ही तुम्हाला सांगतो की, हा ब्रँड येत्या आठवड्यात रोजी भारतात LAVA Bold 5G लाँच करणार आहे. हा एक स्वस्त 5G फोन असेल, जो कमी किमतीत 64MP कॅमेरा, 5000mAh बॅटरीसह येईल. जाणून घेऊयात LAVA Bold 5G चे संपूर्ण तपशील-
SurveyAlso Read: बजेटमध्ये मोठ्या स्क्रीनसह Thomson QLED TV भारतात लाँच, किंमत 6,799 पासून सुरु
LAVA Bold 5G चे लाँच डिटेल्स
देशी स्मार्टफोन निर्माता LAVA ने माहिती दिली आहे की, ते 8 एप्रिल रोजी भारतीय बाजारात आपला नवीन स्मार्टफोन लाँच करणार आहेत. Lava ने Amazon लिस्टिंगवरून या फोनच्या लाँचची तारीख जाहीर केली आहे. या मोबाईलची विक्री 8 एप्रिल रोजी दुपारी 12 वाजल्यापासून सुरू होईल. हा फोन सफायर ब्लु कलर ऑप्शन्समध्ये लाँच केला जाणार आहे. स्पेशल लाँच ऑफर अंतर्गत हा फोन 10,499 रुपयांमध्ये खरेदी करता येईल.

LAVA Bold 5G चे फीचर्स आणि स्पेक्स
Amazon लिस्टिंगद्वारे फोनचे अनेक तपशील पुढे आले आहेत. त्यानुसार, हा स्वस्त 5G फोन 120Hz रिफ्रेश रेट आणि इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर तंत्रज्ञानासह पंच-होल स्टाईल 6.67-इंच लांबीच्या स्क्रीनला सपोर्ट करतो. उत्तम परफॉर्मन्स, स्पीड आणि मल्टीटास्किंगसाठी, हा फोन मीडियाटेक डायमेन्सिटी 6300 ऑक्टा-कोर प्रोसेसरवर सादर केला जाणार आहे. यासह, फोन 4GB रॅम, 6GB रॅम आणि 8GB रॅममध्ये लाँच केला जाणार आहे.
फोटोग्राफीसाठी, स्वस्त LAVA Bold 5G फोनमध्ये ड्युअल रियर कॅमेरा देण्यात येईल. यासह, फोनच्या मागील पॅनलवर LED फ्लॅशसह सुसज्ज 64MP चा मुख्य कॅमेरा आहे, जो Sony सेन्सर मिळेल. त्याबरोबरच, AI लेन्स मिळणार आहे. आकर्षक सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी या फोनमध्ये 16MP चा फ्रंट कॅमेरा मिळेल. पॉवर बॅकअपसाठी, या फोनमध्ये 5000mA बॅटरी देण्यात येईल, जी 33W फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजीसह येऊ शकते. मात्र, फोनची योग्य किंमत आणि संपूर्ण कन्फर्म फीचर्स फोन लाँच झाल्यावरच पुढे येतील.
Reshma Zalke
Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile