Lava ने आणला देशातील सर्वात स्वस्त 5G फोन, मिळेल 7GB RAM सह 50MP कॅमेरा

Lava ने आणला देशातील सर्वात स्वस्त 5G फोन, मिळेल 7GB RAM सह 50MP कॅमेरा
HIGHLIGHTS

Lava Blaze 5G इंडियन मोबाईल काँग्रेस 2022 मध्ये लाँच

फोनची किंमत अद्यापही पडद्याआड

फोनमध्ये तुम्हाला एकूण 7 GB रॅम मिळेल

देशांतर्गत कंपनी Lava ने Lava Blaze 5G हा नवीन हँडसेट लाँच केला आहे. कंपनीने हा फोन इंडियन मोबाईल काँग्रेस 2022 मध्ये लाँच केला आहे. फोनच्या किंमतीबाबत अद्याप कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. हा देशातील सर्वात स्वस्त 5G हँडसेट असेल. मात्र, कंपनीने सांगितले की, त्याची किंमत सुमारे 10 हजार रुपये असेल. हा फोन दिवाळीच्या आसपास प्री-ऑर्डरसाठी उपलब्ध करून दिला जाईल. या फोनमध्ये कंपनी आठ 5G बँडसाठी सपोर्ट ऑफर करत आहे. यात 4 GB (रिअल) + 3 GB (व्हर्च्युअल) रॅमचा सपोर्ट आहे. जाणून घेऊयात विशेषता… 

हे सुद्धा वाचा : 50 मेगापिक्सेल कॅमेराने सुसज्ज असलेला स्वस्त SAMSUNG स्मार्टफोन लाँच, जाणून घ्या किंमत

Lava Blaze 5G चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स 

Lava च्या या फोनमध्ये तुम्हाला 720×1600 पिक्सेल रिझोल्यूशनसह 6.5-इंच लांबीचा फुल HD + LCD पॅनेल मिळेल. वॉटरड्रॉप नॉच डिझाइनसह येणाऱ्या या डिस्प्लेचा रिफ्रेश रेट 90Hz आहे. फोन 4 GB रॅम आणि 128 GB इंटर्नल स्टोरेज पर्यायात येतो. विशेष बाब म्हणजे कंपनी या फोनमध्ये 3 GB व्हर्चुअल रॅम सपोर्ट देखील देत आहे, ज्यामुळे त्याची एकूण रॅम 7 GB झाली आहे. प्रोसेसर म्हणून तुम्हाला त्यात MediaTek Dimensity 700 चिपसेट मिळेल.

त्याबरोबरच, हा 5G फोन Android 12 वर काम करतो. ब्लू आणि ग्रीन कलरमध्ये येणाऱ्या या फोनमध्ये कनेक्टिव्हिटीसाठी ड्युअल सिम, Wi-Fi 6, ब्लूटूथ 5.1, GPS, USB टाइप-C पोर्ट आणि 3.5 मिमी हेडफोन जॅक असे पर्याय देण्यात आले आहेत.

फोनच्या मागील बाजूस LED फ्लॅशसह तीन कॅमेरे देण्यात आले आहेत. यामध्ये डेप्थ सेन्सर आणि 50 मेगापिक्सेलच्या प्रायमरी लेन्ससह मॅक्रो सेन्सरचा समावेश आहे. सेल्फीसाठी फोनमध्ये 8-मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आहे. मायक्रो SD कार्डला सपोर्ट करणाऱ्या या फोनमध्ये दिलेली बॅटरी 5000mAh ची आहे.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo