Lava Blaze 5G : बजेट स्मार्टफोन आणखी स्वस्तात खरेदी करा, भारी ऑफर्सचा लाभ घ्या

HIGHLIGHTS

Lava Blaze 5G च्या 16GB + 128GB स्टोरेज वेरिएंटची किंमत 16,345 रुपये

अवघ्या 600 रुपयांमध्ये तुम्हाला नवा स्मार्टफोन मिळेल.

बँक ऑफर्स आणि इतर ऑफर्ससह कमी किमतीत खरेदी करा.

Lava Blaze 5G : बजेट स्मार्टफोन आणखी स्वस्तात खरेदी करा, भारी ऑफर्सचा लाभ घ्या

5G चे युग आले तेव्हापासून 5G स्मार्टफोनची आवश्यकता सुरु झाली आहे. आता 5G नेटवर्क वापरण्यासाठी प्रत्येकाकडे 5G स्मार्टफोन असणे आवश्यक आहे. अशात स्मार्टफोन कंपन्या देखील आपल्या ग्राहकांसाठी स्वस्तात 5G फोन उपलब्ध करून देत आहेत. तुम्हाला देखील जर बजेटमध्ये 5G स्मार्टफोन हवा असेल, तर जबरदस्त फीचर्ससह Lava Blaze 5G स्मार्टफोन उत्तम पर्याय आहे. या फोनवर सध्या ऑफर्स देखील मिळत आहेत. 

Digit.in Survey
✅ Thank you for completing the survey!

Lava Blaze 5G ची किमंत 

Lava Blaze 5G ऑनलाइन शॉपिंग वेबसाइट Amazon वर कमी किमतीत सूचिबद्ध करण्यात आले आहे. Lava Blaze 5G च्या 16GB + 128GB स्टोरेज वेरिएंटची किंमत 16,345 रुपये आहे. मात्र, Amazon वरून स्मार्टफोन 27% सूटसह खरेदी करता येईल. या सवलतीसह फोन 11,999 मध्ये खरेदी करू शकता. 

ऑफर्स  : 

या स्मार्टफोनला आणखी कमी किमतीत खरेदी करण्यासाठी बँक ऑफर्सदेखील तुम्हाला मिळणार आहेत. बँक ऑफर्ससह तुम्हाला 10% सूट मिळणार आहे. HDFC बँक क्रेडिट कार्डने EMI वर स्मार्टफोन खरेदी केल्यास, 1500 रुपये वाचवण्याची संधी आहे. अधिक माहितीसाठी आणि खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा 

याव्यतिरिक्त, जर तुम्हाला एखादा जुना स्मार्टफोन एक्सचेंज करून नवा स्मार्टफोन खरेदी करायचा असेल तर, यासाठी Lava Blaze 5G वर 11,350 रुपयांची एक्सचेंज ऑफर मिळत आहे. या ऑफरसह अवघ्या 600 रुपयांमध्ये तुम्हाला नवा स्मार्टफोन मिळेल. एक लक्षात घ्या की, स्मार्टफोनच्या किमती जवळपास बदलत राहण्याची शक्यता आहे. 

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo