Lava blaze 2 : देशी कंपनीचा नवा फोन 11GB रॅमसह लाँच, किंमत तुमच्या बजेटमध्ये

HIGHLIGHTS

Lava blaze 2 भारतात लाँच झाला आहे.

नव्या फोनची किंमत 8,999 रूपये

फोन 18 एप्रिल रोजी दुपारी 12 वाजतापासून Amazon वर उपलब्ध होईल.

Lava blaze 2 : देशी कंपनीचा नवा फोन 11GB रॅमसह लाँच, किंमत तुमच्या बजेटमध्ये

देशी कंपनी Lava ने आपल्या blaze सिरीजचा नवं फोन Lava blaze 2 भारतात लाँच केला आहे. हा फोन Lava blaze 5G चा अपग्रेडेड वर्जन म्हणून लाँच करण्यात आला आहे. फोनमध्ये तुम्हाला प्रीमियम ग्लास बॅक डिझाईन मिळेल. तसेच, हा फोन ग्राहकांच्या खिशाला परवडणारा फोन आहे. चला तर मग जाणून घेऊयात फोनचे फीचर्स, स्पेसिफिकेशन आणि किंमत –

Digit.in Survey
✅ Thank you for completing the survey!

Lava blaze 2 चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन

Lava च्या या फोनमध्ये तुम्हाला 6.5 इंचचा कर्व HD प्लस IPS डिस्प्ले मिळेल. हा डिस्प्ले 90Hz रिफ्रेश रेटसह येतो. यामध्ये ऑक्टॅकोर युनिसॉक T616 प्रोसेसरसह 6GB पर्यंत रॅम मिळेल, जी वरच्युअल रॅमसह 11GB पर्यंत वाढवता येईल. त्याबरोबरच, 128GB स्टोरेज देखील दिली गेली आहे. फोन अँड्रॉइड 13 सह सादर करण्यात आला आहे. 

त्याबरोबरच, फोनमध्ये 5000mAh बॅटरी आणि 18W फास्ट चार्जिंग सपोर्ट देण्यात आला आहे. सिक्योरोटीसाठी यात साईड माऊंटेड फिंगरप्रिंट सेन्सर मिळेल. कनेक्टिव्हिटीसाठी वायफाय, ब्लूटूथ, ऑडियो जॅक आणि USB टाईप C सपोर्ट दिला आहे. .

फोटोग्राफीसाठी फोनमध्ये ड्युअल रीयर कॅमेरा सेटअप आहे. ज्याचा मेन कॅमेरा 13MP चा आहे. तर, सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी 8MP चा कॅमेरा देण्यात आला आहे. 

किंमत :

Lava blaze 2 च्या 6GB रॅम आणि 128GB स्टोरेजची किंमत 8,999 रूपये आहे. फोन 18 एप्रिल रोजी दुपारी 12 वाजतापासून Amazon वर उपलब्ध होईल. फोन तुम्हाला ग्लास ब्लॅक, ग्लास ऑरेंज आणि ग्लास ब्लू रंगात खरेदी करता येईल.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo