Lava Agni 2 ची आज भारतात पहिली सेल सुरू झाली आहे. पहिल्या सेलमध्ये सवलतीसह स्मार्टफोन खरेदी करण्याची संधी आहे. लावा अग्नी 2 ची पहिली विक्री आज म्हणजेच 24 मे 2023 रोजी सकाळी 10 वाजता सुरू झाली आहे. मात्र, हा फोन अवघ्या दीड तासात आऊट ऑफ स्टॉक झाला आहे. ई-कॉमर्स वेबसाइट Amazon आणि कंपनीच्या अधिकृत वेबसाइटवरून हा फोन खरेदी करता येणार आहे.
पहिल्या सेलमध्ये Lava Agni 2 19,999 रुपयांच्या स्पेशल ऑफर किंमतीसह खरेदी करता येणार आहे. कंपनीने हा फोन 21,999 रुपयांना लाँच केला आहे. विशेषतः ऑफर्सबद्दल बोलायचे झाल्यास सर्व क्रेडिट आणि डेबिट कार्डवर 2000 रुपयांची सूट मिळेल. अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा
Lava Agni 2 5G
या स्मार्टफोनमध्ये 6.78 इंच फुल HD + AMOLED कर्व डिस्प्ले आहे, ज्याचा रिफ्रेश रेट 120Hz आहे. स्क्रीन HDR, HDR 10 आणि HDR 10+ या सपोर्टसह येते. यात इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर मिळेल. फोनमध्ये 8GB रॅमसह 256GB अंतर्गत स्टोरेज उपलब्ध आहे. फोन MediaTek Dimensity 7050 प्रोसेसर सह येतो. हे Android 13 वर चालते. यात 4700mAh ची बॅटरी आहे.
कॅमेरा स्पेक्सबद्दल बोलायचे झाल्यास, स्मार्टफोनच्या मागील बाजूस कंपनीने 50MP क्वाड रियर कॅमेरा सेटअप दिला आहे. यामध्ये 50MP+8MP+ 2MP+2MP डेप्थ लेन्स आहे. तर समोर 16MP कॅमेरा सेल्फीसाठी देण्यात आला आहे.
Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile