Dimensity 810 प्रोसेसरसह Oppo A77 5G स्मार्टफोन लाँच, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स

Dimensity 810 प्रोसेसरसह Oppo A77 5G स्मार्टफोन लाँच, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स
HIGHLIGHTS

Oppoकडून Oppo A77 5G स्मार्टफोन लाँच

स्मार्टफोनची किंमत सुमारे 22,500 रुपये

Oppo A77 5G मध्ये ड्युअल रियर कॅमेरा सेटअप उपलब्ध

Oppo ने थायलंडमध्ये आपला नवीन फोन Oppo A77 5G लाँच केला आहे. Oppo A77 5G दोन कलर  ऑप्शन्समध्ये सादर करण्यात आला आहे. याशिवाय Oppo A77 5G मध्ये MediaTek Dimensity 810 प्रोसेसर देण्यात आला आहे. या Oppo फोनमध्ये 90Hz च्या रिफ्रेश रेटसह वॉटरड्रॉप नॉच डिस्प्ले आहे. तसेच, फोनमध्ये ड्युअल रियर कॅमेरा सेटअप देखील आहे, ज्यामध्ये प्रायमरी लेन्स 48 मेगापिक्सेल आहे. चला तर जाणून घेऊयात स्मार्टफोनचे स्पेसिफिकेशन्स आणि किंमत… 

Oppo A77 5G चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स

Oppo A77 5G मध्ये Android 12 आधारित ColorOS 12.1 आहे. याशिवाय, यात 90Hz च्या रीफ्रेश रेटसह 6.56-इंच लांबीचा HD+ डिस्प्ले देखील आहे. डिस्प्लेची ब्राइटनेस 600 nits आहे. यात MediaTek Dimensity 810 प्रोसेसर आहे. तसेच फोनमध्ये 5 GB व्हर्च्युअल रॅम आणि 128 GB स्टोरेज उपलब्ध आहे.

 हे सुद्धा वाचा :  जूनमध्ये OTT प्लॅटफॉर्मवर नव्या वेब सिरीज आणि चित्रपटांचा आनंद घ्या, बघा यादी

कॅमेरा : 

कॅमेर्‍याबद्दल बोलायचे झाले तर, Oppo A77 5G मध्ये ड्युअल रियर कॅमेरा सेटअप आहे, ज्यामध्ये प्रायमरी लेन्स 48 मेगापिक्सेल आहे. त्याबरोबरच दुसरी लेन्स 2-मेगापिक्सेल डेप्थ सेन्सर आहे. आकर्षक सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी फोनमध्ये 8-मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.

बॅटरी :

Oppo A77 5G वरील कनेक्टिव्हिटी पर्यायांमध्ये Wi-Fi 802.11 ac/a/b/g/n/, Bluetooth v5.3, GPS, NFC, 3.5mm जॅक, A-GPS, BeiDou, GLONASS, GALILEO, QZSS आणि Type-C यांचा समावेश आहे. यात साइड माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर देखील आहे. Oppo A77 5G मध्ये 5000mAh बॅटरी आहे, जी 33W SuperVOOC चार्जिंगला सपोर्ट करते. 

Oppo A77 5G स्मार्टफोनची किंमत

थायलंडमध्ये, 6 GB रॅम आणि 128 GB स्टोरेजसह Oppo A77 5G ची किंमत 9,999 थाई बात म्हणजे सुमारे 22,500 रुपये आहे. मात्र, Oppo च्या थायलंड साइटवर फोनची किंमत दिली गेली नाही. Oppo A77 5G मिडनाईट ब्लॅक आणि ओशन ब्लॅक कलर ऑप्शन्समध्ये खरेदी केला जाऊ शकतो. भारतासह इतर बाजारपेठांमध्ये Oppo A77 5G च्या उपलब्धतेबद्दल सध्या कोणतीही माहिती दिली गेली नाही.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo