5500mAh बॅटरीसह येणाऱ्या Vivo V40e वर मिळतेय अप्रतिम ऑफर, ‘या’ ठिकाणी मिळतेय Best ऑफर्स 

HIGHLIGHTS

Vivo ची Vivo V40 सिरीज भारतीय बाजारात मोठ्या प्रमाणात लोकप्रिय आहे.

Vivo V40e स्मार्टफोन्सवर मोठ्या प्रमाणात ऑफर्स उपलब्ध आहेत.

Vivo V40e हा स्मार्टफोन मिड बजेट रेंजमध्ये सादर करण्यात आला आहे.

5500mAh बॅटरीसह येणाऱ्या Vivo V40e वर मिळतेय अप्रतिम ऑफर, ‘या’ ठिकाणी मिळतेय Best ऑफर्स 

प्रसिद्ध स्मार्टफोन निर्माता Vivo ची Vivo V40 सिरीज भारतीय बाजारात मोठ्या प्रमाणात लोकप्रिय झाली आहे. या सिरीजच्या स्मार्टफोनवर सध्या अनेक सवलती मिळत आहेत. या रिपोर्टमध्ये आम्ही तुम्हाला Vivo V40e वरील ऑफर्सबद्दल माहिती देण्यात आली आहे. हा स्मार्टफोन मिड बजेट रेंजमध्ये सादर करण्यात आला आहे. Chroma वर हा फोन भारी सवलतींसह उपलब्ध आहे. जाणून घेऊयात Vivo V40e ची किमत आणि ऑफर्स-

Digit.in Survey
✅ Thank you for completing the survey!

Also Read: WhatsApp New Feature: स्टेटस आता थेट Instagram आणि Facebook वर करता येतील शेअर, नवे फिचर दाखल

Vivo V40e 5G
Vivo V40e 5G

Vivo V40e ची किंमत आणि ऑफर्स

किमतीबद्दल बोलायचे झाल्यास, Vivo V40e फोनचा 8GB+ 128GB स्टोरेज व्हेरिएंट Croma वर 26,999 रुपयांना उपलब्ध आहे. तर, या डिव्हाइसचे 8GB+ 256GB स्टोरेज मॉडेल 28,999 रुपयांमध्ये खरेदीसाठी सूचिबद्ध आहे. ऑफर्सबद्दल बोलायचे झाल्यास, Vivo V40e स्मार्टफोनवर IDFC बँकेकडून 1500 रुपयांची सूट मिळत आहे. ही ऑफर क्रेडिट कार्ड वापरणाऱ्या ग्राहकांसाठी आहे. त्याबरोबरच, या फोनवर 1,271 रुपयांचा EMI आणि एक्सचेंज ऑफर देखील मिळेल. हा फोन रॉयल ब्राँझ आणि मिंट ग्रीन कलर ऑप्शन्समध्ये उपलब्ध आहे.

Vivo V40e फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स

Vivo V40e स्मार्टफोन 6.77-इंच लांबीच्या AMOLED कर्व डिस्प्लेसह आणि 120Hz च्या रिफ्रेश रेटसह येतो. सुरक्षिततेसाठी, यात फिंगरप्रिंट सेन्सर आणि फेस अनलॉक देखील आहे. स्पीड आणि मल्टीटास्किंगसाठी, या फोनमध्ये 8 कोर काउंटसह MediaTek Dimensity 7300 प्रोसेसर दिला गेला आहे. आम्ही तुम्हाला सांगतो की, हा स्मार्टफोन Android 14 वर कार्य करतो. पॉवर बॅकअपसाठी, या फोनमध्ये 5500mAh जंबो बॅटरी उपलब्ध आहे, जी 80W जलद चार्जिंगसह समर्थित आहे.

Vivo-V40e-3.jpg
Vivo-V40e-3.jpg

फोटोग्राफीसाठी, Vivo फोनमध्ये ड्युअल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. यात 50MP मुख्य सेन्सर आणि 8MP अल्ट्रा वाइड अँगल सेन्सर आहे. तसेच, यामध्ये ऑरा लाईट देखील देण्यात आली आहे. ज्याद्वारे उत्कृष्ट फोटो क्लिक केले जाऊ शकतात. Vivo V40E मध्ये उत्कृष्ट सेल्फी क्लिक करण्यासाठी 50MP फ्रंट कॅमेरा आहे. याव्यतिरिक्त, व्हिडिओ, मायक्रो मूव्ही, हाय रिझोल्युशन, ड्युअल व्ह्यू, लाइव्ह, नाईट आणि पोर्ट्रेट इ. अनेक कॅमेरा फीचर्स हँडसेटमध्ये देण्यात आले आहेत. कनेक्टिव्हिटीसाठी, फोनमध्ये USB टाइप-C, ड्युअल सिम, Wi-Fi, GPS आणि ब्लूटूथ यांसारखे फीचर्स देण्यात आले आहेत.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo