आकर्षक लुकसह Realme 14 Pro Lite 5G भारतात लाँच! जाणून घ्या किंमत आणि तगडे फीचर्स
Realme ने Realme 14 Pro Lite 5G भारतीय बाजारात लाँच केला आहे.
Realme स्मार्टफोन कंपनीने 25,000 रुपयांपेक्षा कमी किमतीत लाँच केला आहे.
Realme 14 Pro Lite 5G हा स्मार्टफोन भारतीय बाजारात दोन स्टोरेज व्हेरिएंटमध्ये सादर करण्यात आला आहे
प्रसिद्ध स्मार्टफोन निर्माता Realme ने Realme 14 Pro Lite 5G भारतीय बाजारात लाँच केला आहे. आम्ही तुम्हाला सांगतो की, हे 14 Pro सिरीजमधील एक नवे उपकरण आहे. हा स्मार्टफोन कंपनीने 25,000 रुपयांपेक्षा कमी किमतीत लाँच केला आहे. या किमतीत तुम्हाला या फोनमध्ये 50MP पॉवरफुल कॅमेरा आणि मोठ्या बॅटरीसारखे पॉवरफुल फीचर्स मिळतील. चला तर मग जास्त वेळ न घालवता जाणून घेऊयात Realme 14 Pro Lite 5G ची किंमत आणि फीचर्स-
SurveyRealme 14 Pro Lite 5G ची किंमत
Realme 14 Pro Lite 5G हा स्मार्टफोन भारतीय बाजारात दोन स्टोरेज व्हेरिएंटमध्ये सादर करण्यात आला आहे. या डिव्हाइसच्या 8GB+ 128GB स्टोरेज मॉडेलची किंमत 21,999 रुपये इतकी निश्चित करण्यात आली आहे. तर, फोनचा दुसरा 8GB + 256GB स्टोरेज व्हेरिएंट 23,999 रुपयांना उपलब्ध करून देण्यात आला आहे. हा फोन ग्लास गोल्ड आणि पर्पल कलर ऑप्शन्समध्ये सादर करण्यात आला आहे.

Realme 14 Pro Lite 5G चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स
डिस्प्ले
Realme 14 Pro Lite मध्ये 6.7-इंच लांबीचा OLED FHD+ डिस्प्ले देण्यात आला आहे, ज्याचा रिफ्रेश रेट 120Hz आहे. तसेच, संरक्षणासाठी या फोनमध्ये कॉर्निंग गोरिल्ला ग्लास 7i बसवण्यात आला आहे.
प्रोसेसर
सुपरफास्ट काम करण्यासाठी, या Realme स्मार्टफोनमध्ये Qualcomm चा Snapdragon 7s Gen 2 प्रोसेसर देण्यात आला आहे. याशिवाय, हँडसेटमध्ये 256GB पर्यंत अंतर्गत स्टोरेज आणि व्हर्च्युअल रॅम आहे.
कॅमेरा
फोटोग्राफीसाठी, Realme च्या मोबाईल फोनमध्ये 50MP Sony LYT-600 प्रायमरी सेन्सर आणि 8MP अल्ट्रा वाइड अँगल लेन्स आहे. तसेच, आकर्षक सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी हँडसेटच्या पुढील बाजूस 32MP फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.
बॅटरी
बॅटरीबद्दल बोलायचे झाल्यास, पॉवर बॅकअपसाठी Realme 14 Pro Lite कंपनीने या स्मार्टफोनमध्ये 5200mAh जंबो बॅटरी दिली आहे, जी 45W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करेल.
विशेष फीचर्स
या फोनच्या विशेष फीचरबद्दल बोलायचे झाल्यास, या फोनमध्ये हानिकारक किरणे कमी करण्यासाठी AI आय प्रोटेक्शन टेक्नॉलॉजी उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसेच, गरम होण्याची समस्या दूर करण्यासाठी या फोनमध्ये 3D VC कूलिंग सिस्टम आहे.
Reshma Zalke
Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile