Poco M7 Pro 5G, C75 5G Launched: 50MP मेन कॅमेरासह नवे फोन्स भारतात लाँच, किंमत 16000 रुपयांपेक्षा कमी 

HIGHLIGHTS

लेटेस्ट Poco M7 Pro आणि Poco C75 स्मार्टफोन भारतात लाँच

Poco ने अधिकृतपणे आपला नवीन मिड-रेंज आणि एंट्री-लेव्हल स्मार्टफोन भारतीय बाजारपेठेत सादर केले.

Poco M7 Pro आणि Poco C75 लवकरच Flipkart वर उपलब्ध होणार

Poco M7 Pro 5G, C75 5G Launched: 50MP मेन कॅमेरासह नवे फोन्स भारतात लाँच, किंमत 16000 रुपयांपेक्षा कमी 

प्रसिद्ध स्मार्टफोन निर्माता Poco च्या नव्या बजेट स्मार्टफोन्सची प्रतीक्षा अनेक दिवसांपासून सुरु होती. अखेर Poco ने अधिकृतपणे आपला नवीन मिड-रेंज आणि एंट्री-लेव्हल स्मार्टफोन भारतीय बाजारपेठेत सादर केला आहे. Poco M7 Pro आणि Poco C75 असे या दोन्ही स्मार्टफोन्सचे नाव आहे. यात इन-डिस्प्ले सेन्सर आणि Poco M7 Pro सह उत्कृष्ट कॅमेरा अपग्रेड कॅमेरा मिळेल. चला तर मग जाणून घेऊयात Poco M7 Pro 5G आणि Poco C75 5G ची किंमत आणि संपूर्ण तपशील-

Digit.in Survey
✅ Thank you for completing the survey!

Also Read: अगदी स्वस्तात खरेदी करा जबरदस्त iQOO स्मार्टफोन्स, Amazon वर सेल लाईव्ह! पहा Best ऑफर्स

Poco M7 Pro ची भारतीय किंमत

Poco M7 Pro ची 6GB+128GB व्हेरिएंटची किंमत 13,999 रुपये इतकी निश्चित करण्यात आली आहे. तर, फोनच्या 8GB+256GB सह टॉप-एंड व्हेरिएंटची किंमत 15,999 रुपये इतकी आहे. उपलब्धतेबद्दल बोलायचे झाल्यास, हा स्मार्टफोन Flipkart वर 20 डिसेंबर रोजी दुपारी 12 वाजता उपलब्ध होईल.

poco c75 5g

Poco C75 5G ची भारतीय किंमत

Poco C75 5G ची किंमत सिंगल व्हेरिएंटमध्ये सादर केला आहे. फोनच्या 4+64GB व्हेरिएंटची किंमत 7,999 रुपये इतकी आहे. उपलब्धतेबद्दल बोलायचे झाल्यास, हा स्मार्टफोन Flipkart वर 19 डिसेंबरपासून रात्री 12 वाजता उपलब्ध होईल.

Poco C75 5G आणि Poco M7 Pro 5G चे तपशील

डिस्प्ले

Poco M7 Pro हा 6.67-इंच लांबीचा FHD+ AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे. यामध्ये कॉर्निंग गोरिल्ला ग्लास 5 प्रोटेक्शन मिळेल. तर, दुसरीकडे Poco C75 5G फोन 6.88-इंच लांबीच्या स्क्रीनसह 1640×720 पिक्सेल रिझोल्यूशनसह उपलब्ध आहे.

प्रोसेसर

Poco M7 Pro स्मार्टफोनची MediaTek Dimensity 7025 Ultra चिपसेटसह सुसज्ज आहे. हे 8GB पर्यंत रॅम आणि 256GB पर्यंत स्टोरेजसह येते. तर, Poco C75 5G फोनमध्ये उत्तम परफॉर्मन्ससाठी, या स्मार्टफोनमध्ये नवीन स्नॅपड्रॅगन 4s Gen 2 प्रोसेसर मिळतो, जो 4GB पर्यंत RAM आणि 128GB पर्यंत इंटर्नल मेमोरीसह आहे.

poco m7 pro 5g

कॅमेरा

Poco M7 Pro ऑप्टिक्सच्या बाबतीत, स्मार्टफोन 2MP मॅक्रो लेन्ससह 50MP Sony LYT-600 सेन्सरसह येतो. सेल्फीसाठी, M7 Pro 20 MP फ्रंट-फेसिंग कॅमेरासह येतो. तर, दुसरीकडे Poco C75 5G स्मार्टफोन ड्युअल कॅमेरा सेटअपसह येतो. ज्यामध्ये 50MP आणि 1.8 MP QVGA सेकंडरी कॅमेरा आहे. तर, सेल्फी आणि आकर्षकसाठी या स्मार्टफोनमध्ये 5MP फ्रंट कॅमेरा आहे.

बॅटरी

Poco M7 Pro फोनमध्ये 45W फास्ट चार्जिंग सपोर्टसह 5,110 mAh बॅटरी देण्यात आली आहे. तर, Poco C75 5G स्मार्टफोनमध्ये 18W चार्जिंग सपोर्टसह 5160mAh बॅटरी देण्यात आली आहे.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo