50MP AI कॅमेरासह लेटेस्ट Lava Yuva 5G भारतात लाँच, किंमत 10 हजार रुपयांपेक्षा कमी। Tech News
भारतीय बाजारात नवा Lava Yuva 5G स्मार्टफोन लाँच करण्यात आला आहे.
Lava Yuva 5G स्मार्टफोनची विक्री लोकप्रिय ई-कॉमर्स वेबसाइट Amazon द्वारे केली जाईल.
Lava Yuva 5G फोनची सुरुवातीची किंमत 9,499 रुपये आहे.
देशी स्मार्टफोन निर्माता Lava ने अलीकडेच आपल्या Lava Yuva 5G स्मार्टफोनच्या लाँचची घोषणा केली होती. त्यानंतर, गुरुवारी भारतीय बाजारात नवा Lava Yuva 5G स्मार्टफोन लाँच करण्यात आला आहे. विशेष म्हणजे स्मार्टफोनच्या मागील बाजूस एक सर्क्युलर कॅमेरा मॉड्यूल उपलब्ध आहे. नव्या स्मार्टफोनची विक्री लोकप्रिय ई-कॉमर्स वेबसाइट Amazon द्वारे केली जाईल. जाणून घेऊयात Lava Yuva 5G ची किंमत आणि स्पेसिफिकेशन्स-
SurveyAlso Read: Nothing Phone (2a) स्पेशल एडिशन स्मार्टफोन लाँच, काय मिळेल विशेष? जाणून घ्या किंमत
Lava Yuva 5G ची भारतीय किंमत
Lava Yuva 5G दोन व्हेरिएंटमध्ये भारतात सादर करण्यात आला आहे. फोनच्या बेस व्हेरिएंटमध्ये 4GB रॅमसह 64GB स्टोरेज मिळेल. तर, फोनच्या टॉप व्हेरिएंटमध्ये 4GB रॅम आणि 128GB अंतर्गत स्टोरेज मिळेल. Lava Yuva 5G फोनची सुरुवातीची किंमत 9,499 रुपये आहे. तर, फोनचा टॉप व्हेरिएंट 9,999 रुपयांना लाँच करण्यात आला आहे.
Introducing Yuva 5G: The coolest buddy for every Gen-Z!
— Lava Mobiles (@LavaMobile) May 30, 2024
Ab Yuva Banega 5G!
Sale starts on 5th June, 12 PM!
Starting ₹9,499/-#Yuva5G #AbYuvaBanega5G #LavaMobiles #ProudlyIndian pic.twitter.com/tDntlW1Q2k
उपलब्धतेबद्दल बोलायचे झाल्यास, या फोनची विक्री Amazon वर 5 जून 2024 पासून सुरू होईल. हा स्मार्टफोन दोन व्हेरिएंटमध्ये सादर करण्यात आला आहे. या फोनमध्ये मिस्टिक ग्रीन आणि मिस्टिक ब्लू अशा दोन कलर ऑप्शन्सचा समावेश आहे.
Lava Yuva 5G चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स
Lava Yuva 5G फोनमध्ये 6.52 इंच लांबीचा HD + IPS डिस्प्ले आहे, ज्याचा रिफ्रेश रेट 90Hz इतका आहे. स्पीड आणि मल्टीटास्किंगसाठी, या स्मार्टफोनमध्ये उत्तम परफॉर्मन्ससाठी UNISOC T750 5 प्रोसेसर देण्यात आला आहे. फोनमध्ये 4GB रॅमसोबत 4GB व्हर्च्युअल रॅमचा पर्याय आहे. यात 128GB पर्यंत स्टोरेज आहे. तर, फोनचे स्टोरेज मायक्रो SD कार्डच्या मदतीने 1TB पर्यंत वाढवता येईल.

Lava च्या या नवीन फोनमध्ये फोटोग्राफीसाठी फोनच्या मागील बाजूस 50MP AI मुख्य कॅमेरा मिळेल. तर, सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी फोन 8MP कॅमेरासह सुसज्ज आहे. बॅटरीबद्दल बोलायचे झाल्यास, हा 5G फोन 5000mAh बॅटरीसह येतो, जी 18W फास्ट चार्जिंगच्या सपोर्टसह येईल.
Reshma Zalke
Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile