64MP कॅमेरासह Lava Bold 5G ची भारतात सादर, किती असेल किंमत? पहा टॉप 5 फीचर्स 

HIGHLIGHTS

Lava इंटरनॅशनलने आज देशात आपला LAVA Bold 5G नवीन स्मार्टफोन लाँच केला आहे.

कंपनीने भारतात कमी किमतीचा 5G मोबाईल LAVA Bold 5G लाँच केला आहे.

ICICI आणि SBI क्रेडिट कार्डद्वारे पेमेंट व्यवहार केल्यास भारी सूट

64MP कॅमेरासह Lava Bold 5G ची भारतात सादर, किती असेल किंमत? पहा टॉप 5 फीचर्स 

प्रसिद्ध भारतीय मोबाईल कंपनी Lava इंटरनॅशनलने आज देशात आपला नवीन स्मार्टफोन लाँच केला आहे. होय, कंपनीने भारतात कमी किमतीचा 5G मोबाईल LAVA Bold 5G लाँच केला आहे. त्याबरोबरच, हा नवीन फोन आजपासून भारतीय बाजारात विक्रीसाठी उपलब्ध असणार आहे. आम्ही तुम्हाला सांगतो की, परवडणारा Lava 5G फोन 64MP कॅमेरा, कर्व AMOLED डिस्प्ले आणि 8GB रॅमने सुसज्ज आहे. Lava Bold 5G ची किंमत आणि स्पेसिफिकेशन्स-

Digit.in Survey
✅ Thank you for completing the survey!

Also Read: POCO C71 ची भारतात पहिली सेल आज! बजेट स्मार्टफोनमध्ये मिळेल दीर्घकाळ टिकणारी बॅटरी

Lava Bold 5G ची किंमत

Lava Bold 5G फोन भारतात तीन रॅम व्हेरिएंटमध्ये लाँच करण्यात आला आहे. हे तिन्ही व्हेरिएंट 128GB स्टोरेज व्हेरिएंटला सपोर्ट करतात. किंमतीबद्दल बोलायचे झाले तर, त्याचा 4GB रॅम व्हेरिएंट 11,999 रुपयांना लाँच करण्यात आला आहे. तर, फोनच्या 6GB रॅम मॉडेलची किंमत 12,999 रुपये आहे. अखेर फोनच्या सर्वात मोठ्या मॉडेलची म्हणजेच 8GB रॅम व्हेरिएंटची किंमत 13,999 रुपये इतकी निश्चित करण्यात आली आहे.

Lava Bold 5G ऑफर्स

Lava Bold 5G फोनवर जबरदस्त लाँच ऑफर्स मिळत आहेत. ऑफर्सबद्दल बोलायचे झाल्यास, बँक ऑफर अंतर्गत या फोनवर 1500 रुपयांच्या सूट मिळेल. ही सूट ICICI आणि SBI क्रेडिट कार्डवर उपलब्ध असेल, अशा प्रकारे LAVA Bold 5G तुम्हाला केवळ 10,499 रुपयांना खरेदी करता येईल. कंपनीने हा फोन सॅफायर ब्लू कलर ऑप्शन्समध्ये आणला गेला आहे. येथून खरेदी करा!

LAVA BOLD 5G
LAVA BOLD 5G

Lava Bold 5G चे फीचर्स आणि स्पेक्स

डिस्प्ले

Lava Bold 5G फोन पंच-होल स्टाईल 3D कर्व्हड AMOLED डिस्प्लेसह लाँच करण्यात आला आहे. हा फोन 6.67 इंच लांबीच्या स्क्रीनला सपोर्ट करतो, ज्यामध्ये 120Hz रिफ्रेश रेट आणि इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर तंत्रज्ञान आहे. कंपनीचा दावा आहे की, या सेगमेंटमधील हा पहिलाच 5G फोन आहे, जो इतक्या कमी दरात ही स्क्रीन देत आहे.

प्रोसेसर

प्रोसेसिंगसाठी, LAVA Bold 5G फोनमध्ये MediaTek चा Dimensity 6300 ऑक्टा-कोर प्रोसेसर देण्यात आला आहे. कंपनीने अँड्रॉइड 14 ऑपरेटिंग सिस्टमवर चालणारा LAVA Bold 5G स्मार्टफोन सादर केला आहे.

स्टोरेज

LAVA Bold 5G फोन भारतात 4GB रॅम, 6GB रॅम आणि 8GB रॅममध्ये लाँच करण्यात आला आहे. तिन्ही प्रकारांमध्ये विस्तारित रॅम तंत्रज्ञान आहे. हे तिन्ही व्हेरिएंट 128GB स्टोरेजसह लाँच केले जातील.

कॅमेरा

LAVA Bold 5G फोटोग्राफीसाठी ड्युअल रियर कॅमेराला सपोर्ट करतो. त्याच्या मागील पॅनलवर LED फ्लॅशसह सुसज्ज 64MP चा मुख्य सोनी सेन्सर आहे, जो सेकंडरी AI लेन्ससह कार्य करतो. आकर्षक सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी स्वस्त 5G फोनमध्ये 16MP चा फ्रंट कॅमेरा उपलब्ध आहे.

बॅटरी

पॉवर बॅकअपसाठी, हा फोन 5000mAh क्षमतेच्या पॉवरफुल बॅटरीला सपोर्ट करतो. ही मोठी बॅटरी लवकर चार्ज करण्यासाठी, हा परवडणारा 5G फोन 33W फास्ट चार्जिंग तंत्रज्ञानाने सुसज्ज आहे.

डिस्क्लेमर: या स्टोरीमध्ये एफिलिएट लिंक्स आहेत.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo