iPhone 16e Sale: खिशाला जास्त ताण नाही! पहिल्या सेलमध्ये स्वस्त iPhone वर धमाकेदार ऑफर्स उपलब्ध

HIGHLIGHTS

Apple ने अलीकडेच स्वस्त iPhone 16e सादर केला आहे.

Amazon आणि Flipkart वरून खरेदी केल्यास 4000 रुपयांची फ्लॅट बँक सूट दिली जात आहे.

डेटा सुरक्षित ठेवण्यासाठी त्यात फेस ID फीचर देखील आहे.

iPhone 16e Sale: खिशाला जास्त ताण नाही! पहिल्या सेलमध्ये स्वस्त iPhone वर धमाकेदार ऑफर्स उपलब्ध

iPhone 16e Sale: जगप्रसिद्ध टेक जायंट Apple चे iPhone आपल्या हातात असावे, असे प्रत्येकाला वाटते. मात्र, हे फोन्स महागडे असल्यामुळे हे स्वप्न काहींसाठी स्वप्नच राहून जाते. हे लक्षात घेऊन कंपनीने स्वस्त iPhone 16e सादर केला आहे. हा फोन कंपनीने अलीकडेच लाँच केला आहे. पहिली सेल आज म्हणजेच 28 फेब्रुवारी 2025 पासून Apple ऑफिशियल वेबसाइट, स्टोअर सोबत युनिकॉर्न आणि Flipkart सारख्या साईटवर उपलब्ध आहे. पहिल्या सेलमध्ये या आयफोनवर तुम्हाला नो-कॉस्ट EMI पासून ते मोठ्या बँक डिस्काउंटपर्यंत सर्व काही मिळू शकते. याशिवाय, हँडसेटवर एक्सचेंज ऑफर देखील दिली जात आहे. पहा ऑफर्स-

Digit.in Survey
✅ Thank you for completing the survey!

Also Read: नव्या Realme P3x 5G ची सेल भारतात सुरु! पहिल्या सेलमध्ये कवडीमोलात मिळतोय जबरदस्त फोन

apple iPhone 16e Sale started with big deals and offers

iPhone 16e ची किंमत आणि ऑफर्स

Apple चा iPhone 16e भारतात 128GB, 256GB आणि 512GB या तीन स्टोरेज व्हेरिएंटमध्ये विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात आला आहे. या व्हेरिएंटची किंमत अनुक्रमे 59,900 रुपये, 69,900 रुपये आणि 89,900 रुपये इतकी आहे. ऑफर्सबद्दल बोलायचे झाल्यास, Amazon आणि Flipkart वरून खरेदी केल्यास 4000 रुपयांची फ्लॅट बँक सूट दिली जात आहे. त्याबरोबरच, हे डिव्हाइस अधिकृत वेबसाइटवरून 2,496 रुपयांच्या नो-कॉस्ट EMI वर खरेदी करता येईल.

iPhone 16e चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स

या नवीन iPhone 16e मध्ये 6.1-इंच लांबीचा सुपर रेटिना XDR OLED डिस्प्ले देण्यात आला आहे, ज्याचा रिफ्रेश रेट 60Hz आहे. संरक्षणासाठी या डिस्प्लेवर सिरेमिक शील्ड देखील बसवण्यात आले आहे. उत्तम परफॉर्मन्स आणि सुरळीत काम करण्यासाठी, या हँडसेटमध्ये A18 चिप आणि 512GB पर्यंत स्टोरेज देण्यात आले आहे. आम्ही तुम्हाला सांगतो की, iPhone 16e नवीनतम iOS 18 ऑपरेटिंग सिस्टमवर कार्य करेल. त्याबरोबरच, डेटा सुरक्षित ठेवण्यासाठी त्यात फेस ID फीचर देखील आहे. या फोनला IP68 रेटिंग मिळाले आहे.

तसेच, उत्तम फोटोग्राफीसाठी iPhone मध्ये 48MP सिंगल लेन्स आहे, जो ऑप्टिकल इमेज स्टॅबिलायझेशन OIS ला सपोर्ट करतो. एवढेच नाही तर, आकर्षक सेल्फी घेण्यासाठी हँडसेटच्या पुढील बाजूस 12MP चा कॅमेरा आहे. पॉवर बॅकअपसाठी, या फोनमध्ये 3961mAh बॅटरी दिली आहे, जी 18W वायर फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. या फोनमध्ये सीमलेस कनेक्टिव्हिटीसाठी 5G, 4G LTE, Wi-Fi 6, e-SIM, ब्लूटूथ 5.3, NFC, GPS आणि टाइप-C पोर्ट आहे. त्यात Apple Emergency SOS फंक्शन उपलब्ध आहे.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo