Infinix Note 50s 5G+ ची पहिली सेल आज भारतात होणार सुरु, ऑफर्ससह उपलब्ध नवा सुगंधित फोन
भारतीय बाजारात प्रसिद्ध स्मार्टफोन निर्माता Infinix ने Infinix Note 50s 5G+ लाँच केला.
Infinix Note 50s 5G+ च्या मागील पॅनलमध्ये एक खास Scent Tech वापरण्यात आला.
फोनची बॉडी खूप मजबूत आहे आणि पडल्यावरही फोन फुटणार नाही.
गेल्या आठवड्यात भारतीय बाजारात प्रसिद्ध स्मार्टफोन निर्माता Infinix ने Infinix Note 50s 5G+ लाँच केला. आज म्हणजेच 24 एप्रिल 2025 रोजी या स्मार्टफोनची पहिली सेल सुरु होणार आहे. ही सेल प्रसिद्ध इ-कॉमर्स साईट Flipkart वर दुपारी 12 वाजता लाईव्ह होईल. या काळात स्मार्टफोन कमी किमतीत खरेदी करता येईल. विशेष म्हणजे सुगंध सोडणाऱ्या बॅक-पॅनलसह येणार पहिला स्मार्टफोन आहे. या फोनमध्ये अनेक पॉवरफुल फीचर्स देण्यात आले आहेत. चला तर मग जाणून घेऊयात Infinix Note 50s 5G+ ची किंमत आणि ऑफर्स-
SurveyAlso Read: Lava Days Sale: देशी कंपनीची सेल सुरु, बेस्टसेलर फोनवर मिळतोय 4000 रुपयांचा Discount
Infinix Note 50s 5G+ ची किंमत
Infinix Note 50s 5G+ चे 8GB+ 128GB स्टोरेज मॉडेल 15,999 रुपयांना उपलब्ध आहे. तर, दुसरीकडे फोनच्या 8GB+ 256GB स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 17,999 रुपये निश्चित करण्यात आली आहे. ऑफर्सबद्दल बोलायचे झाल्यास, यात ICICI बँकेकडून 1000 रुपयांची सूट मिळणार आहे. तसेच, या डिव्हाइसवर दरमहा 633 रुपयांचा EMI देखील उपलब्ध आहे.

Infinix Note 50s 5G+ चे फीचर्स आणि स्पेक्स
विशेष फीचर्स
Infinix Note 50s 5G+ च्या मागील पॅनलमध्ये एक खास Scent Tech वापरण्यात आला आहे, ज्यामुळे पॅनल बराच काळ सुगंध सोडतो. त्याला MIL-STD 810H मिलिटरी ग्रेड मिळाला आहे. म्हणजेच फोनची बॉडी खूप मजबूत आहे आणि पडल्यावरही फोन फुटणार नाही. डेटा सुरक्षित ठेवण्यासाठी, हँडसेटमध्ये फिंगरप्रिंट सेन्सर आणि फेस अनलॉक फीचर फंक्शन आहे.
डिस्प्ले
स्मार्टफोनमध्ये 6.78 इंच लांबीचा AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे, ज्याचा रिफ्रेश रेट 144Hz इतका आहे. संरक्षणासाठी या डिस्प्लेवर गोरिल्ला ग्लास 5 बसवण्यात आला आहे.
प्रोसेसर आणि स्टोरेज
उत्तम परफॉर्मन्ससाठी, Infinix Note 50S स्मार्टफोनमध्ये MediaTek Dimensity 7300 Ultimate चिप बसवण्यात आली आहे. स्टोरेज सेक्शनबद्दल बोलायचे झाल्यास, या फोनमध्ये 8GB रॅम आणि 256GB पर्यंत इंटरनल स्टोरेज आहे.

कॅमेरा
फोटोग्राफीसाठी, या Infinix Note 50s 5G+ हँडसेटमध्ये 64MP कॅमेरा देण्यात आला आहे. आकर्षक सेल्फी काढण्यासाठी या फोनमध्ये 13MP फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. याद्वारे 4K व्हिडिओ रेकॉर्ड करता येईल.
बॅटरी आणि कनेक्टिव्हिटी
पॉवर बॅकअपसाठी, हा स्मार्टफोन 45W फास्ट चार्जिंगसह 5500mAh बॅटरीने सुसज्ज आहे. कनेक्टिव्हिटीसाठी, स्मार्टफोनमध्ये Wi-Fi, ड्युअल सिम स्लॉट, GPS, ब्लूटूथ, ऑडिओ जॅक आणि USB टाइप-C पोर्ट आहे. हा स्मार्टफोन अँड्रॉइड 15 आधारित XOS 15 वर कार्य करतो.
Reshma Zalke
Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile