कार्बन क्वांट्रो L50HD स्मार्टफोन ऑनलाइन उपलब्ध

कार्बन क्वांट्रो L50HD स्मार्टफोन ऑनलाइन उपलब्ध
HIGHLIGHTS

कार्बन भारतात आपला नवीन स्मार्टफोन कार्बन क्वांट्रो L50 HD लवकरच लाँच करण्याची योजना बनवत आहे. लाँचच्या आधीच कंपनीने आपल्या ह्या स्मार्टफोनला आपल्या वेबसाइटवर किंमतीशिवाय लिस्ट केले आहे.

कार्बनने भारतात आपला नवीन स्मार्टफोन कार्बन क्वांट्रो L50 HD लवकरच लाँच करण्याच्या तयारीत आहे. लाँचच्या आधी कंपनीने आपल्या ह्या स्मार्टफोनला आपल्या वेबसाइटवर कोणत्याही किंमतीशिवाय लिस्ट केले होते. तथापि, इतर ऑनलाइन रिटेल साइट्सवर ह्या स्मार्टफोनची किंमत ७,९४९ रुपये सांगण्यात येत आहे. कार्बन आपल्या ह्या स्मार्टफोनची सीरिज पहिल्यांदाच बाजारात आणत आहे. आता पाहायचे हे आहे की, हा किती मोठ्या प्रमाणात लोकांना प्रभावित करेल.

 

हा स्मार्टफोन अॅनड्रॉईड 5.1 लॉलापॉपवर चालतो. त्याचबरोबर ह्यात 5 इंचाची HD डिस्प्ले 720×1280 पिक्सेल रिझोल्युशनसह येते. हा एक IPS डिस्प्ले आहे. ह्या स्मार्टफोनमध्ये 1.3GHz क्वाड-कोर प्रोसेसर दिला गेला आहे, त्याचबरोबर ह्यात आपल्याला 2GB ची रॅमसुद्धा मिळत आहे.

 

फोटोग्राफीसाठी ह्या स्मार्टफोनमध्ये 13 मेगापिक्सेलचा रियर कॅमेरा f/2.0 अॅपर्चरसह मिळत आहे. त्याचबरोबर ह्यात फेज डिटेक्शन ऑटोफोकस (PADF), ब्लू ग्लास फिल्टर आणि LED फ्लॅशसुद्धा मिळत आहे. स्मार्टफोनमध्ये 5 मेगापिक्सेलचा फिक्स्ड फोकस फ्रंट फेसिंग कॅमेरा दिला गेला आहे, ज्याच्या माध्यमातून आपण उत्कृष्ट सेल्फी घेऊ शकता. स्मार्टफोनमध्ये 16GB चे अंतर्गत स्टोरेजसुद्दा मिळत आहे, ज्याला आपण मायक्रो-एसडी कार्डच्या साहाय्याने 32GB पर्यंत वाढवू शकतो.

स्मार्टफोनमध्ये आपल्याला 2600mAh क्षमतेची बॅटरी मिळत आहे. जी कंपनीनुसार २००  तासांचा स्टँडबाय वेळ आणि ८ तासांचा 2G/3G वर टॉकटाइम देण्यास सक्षम आहे. ह्या स्मार्टफोनच्या कनेक्टिव्हिटी पर्यायाबाबत बोलायचे झाले तर, ह्यात 4G LTE नेटवर्क, ब्लूटुथ, वायफाय(ड्यूल बँड), GPS आणि मायक्रो-USB सुद्धा दिला गेला आहे.

Digit NewsDesk

Digit NewsDesk

Digit News Desk writes news stories across a range of topics. Getting you news updates on the latest in the world of tech. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo