JioBharat Diwali Dhamaka: रिलायन्स Jio चे सर्वेसर्वा मुकेश अंबानी यांनी त्यांच्या ग्राहकांसाठी अप्रतिम दिवाळी गिफ्ट जाहीर केले आहे. आनंदाची बातमी म्हणजे कंपनीने आपल्या दोन 4G फीचर फोनच्या किमतीत मोठी घट केली आहे. खरं तर, रिलायन्स Jio कंपनीने 1000 रुपयांपेक्षा कमी किमतीत हे फोन्स सादर केले आहेत. मात्र, दिवाळीच्या मुहूर्तावर तुम्ही हे फोन आणखी स्वस्तात खरेदी करू शकता.
Survey
✅ Thank you for completing the survey!
आम्हची तुम्हाला सांगतो की, Jio ची ही ऑफर विशेषतः त्या ग्राहकांसाठी आहे, जे अजूनही 2G किंवा 3G फोन वापरतात. आता ते ग्राहक स्वस्तात 4G वर अपग्रेड करण्यास सक्षम असतील. एवढेच नाही तर, या फोनसोबत कंपनी तुम्हाला मोफत मासिक रिचार्जचे बेनिफिट्स देत आहे. जाणून घेऊयात ऑफरबद्दल सर्व तपशील-
Jio कंपनीने JioBharat दिवाळी धमाका ऑफर जाहीर केली आहे. या ऑफर अंतर्गत कंपनीने JioBharat K1 आणि JioBharat V2 ची किंमत कमी केली आहे. हे दोन्ही कंपनीचे 4G फोन आहेत, ज्यांची किंमत 1000 रुपयांपेक्षा कमी आहे. मात्र, आता या ऑफर अंतर्गत हे फोन्स कवडीमोलात खरेदी केले जाऊ शकतात. JioBharat K1 आणि JioBharat V2 ची किंमत 999 रुपये आहे. परंतु दिवाळी ऑफरनंतर तुम्हाला हे फोन्स फक्त 699 रुपयांमध्ये खरेदी करता येईल.
jio launches JioBharat phone at only rs 699 as diwali dhamaka offer
महत्त्वाचे लक्षात घ्या की, या दोन्ही फोन्सवर मिळणारी ही 300 रुपयांची सवलत केवळ सणासुदीपर्यंतच लाईव्ह असेल. ही सवलत तुम्हाला केवळ 3 नोव्हेंबरपर्यंत मिळणार आहे. या फीचर फोनमध्ये UPI पेमेंट सारख्या अनेक प्रगत फीचर्सचा समावेश आहे. तुम्ही या फोनद्वारे QR कोड देखील स्कॅन करू शकता. JioPay वर पेमेंट मिळाल्यावर तुम्हाला आवाज देखील ऐकू येईल.
JioBharat रिचार्ज
वर सांगितल्याप्रमाणे, दिवाळी ऑफरअंतर्गत JioBharat 4G फोनच्या खरेदीवर कंपनी मोफत भेट म्हणून मासिक रिचार्जची सुविधा देखील देणार आहे. या फोन्ससोबत तुम्हाला 123 रुपयांचा प्लॅन फ्री मिळेल. या रिचार्ज प्लॅनमध्ये तुम्हाला एकूण 14GB डेटाचा एक्सेस मिळेल. त्याबरोबरच, यात अमर्यादित व्हॉईस कॉलिंग सुविधेचा लाभ देखील मिळणार आहे. एवढेच नाही तर, या प्लॅनमध्ये तुम्हाला 450 हून अधिक लाईव्ह चॅनेलचा ॲक्सेस देखील मिळेल. रिचार्ज करण्यासाठी क्लिक करा!
Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile