Oppo स्मार्टफोन युजर्ससाठी खुशखबर! मिळेल 5G इंटरनेट स्पीडची खरी मजा, चुटकीसरशी होतील सर्व कामे

Oppo स्मार्टफोन युजर्ससाठी खुशखबर! मिळेल 5G इंटरनेट स्पीडची खरी मजा, चुटकीसरशी होतील सर्व कामे
HIGHLIGHTS

कंपनीच्या 5G डिव्हाइसेसमध्ये Jio च्या स्टँडअलोन 5G सेवेचा लाभ मिळेल

Oppo ने Reliance Jio सोबत केली भागीदारी

कंपनी विद्यमान मॉडेल्स देखील अपग्रेड करत आहे.

चीनी टेक कंपनी Oppo चे जवळपास सर्व 5G स्मार्टफोन आता वापरकर्त्यांना भारतात खरा 5G अनुभव देण्यासाठी तयार आहेत. ओप्पो इंडियाने अधिकृत घोषणेमध्ये म्हटले आहे की, त्यांचे बहुतेक 5G डिवाइस भारतात रिलायन्स जिओच्या स्टँडअलोन 5G नेटवर्कला समर्थन देतील.

हे सुद्धा वाचा : मोठ्या डिस्प्लेसह Fire Boltt Ring Plus स्मार्टवॉच भारतात लाँच, किंमत आहे का तुमच्या बजेटमध्ये ? 

Oppo ने आपल्या वापरकर्त्यांना सर्वोत्तम 5G अनुभव देण्यासाठी Reliance Jio सोबत भागीदारी केली आहे.  कंपनीच्या डिव्हाइसेसमध्ये Jio च्या सेवा घेणार्‍या वापरकर्त्यांना अल्ट्रा-हाय स्पीड आणि जिरो लेटन्सीचा लाभ मिळेल, असे सांगितले आहे. म्हणजेच, Oppo उपकरणांमध्ये उत्तम 5G इंटरनेट अनुभव उपलब्ध असेल.

Oppo विद्यमान मॉडेल्स अपग्रेड करत आहेत. 

Jio च्या स्टँडअलोन 5G नेटवर्कला समर्थन देण्यासाठी Oppo डिव्हाइसेस सक्षम करण्यासाठी कंपनी 5G डिव्हाइसेसवर सॉफ्टवेअर अपडेट आणत आहे. अशा प्रकारे, डिव्हाइसेस अपग्रेड करून उत्तम कनेक्टिव्हिटी सपोर्ट दिला जाईल. कंपनीचे मॉडेल एकाधिक 5G बँड्सना समर्थन देतात.

'या' 5G मॉडेल्सना मिळाले सॉफ्टवेअर अपडेट 

ज्या डिव्हाइसेससाठी कंपनीने आधीच सॉफ्टवेअर अपडेट जारी केले आहे. त्यात Oppo Reno 8, Oppo Reno 8 Pro, Oppo Reno 7, Oppo F21 Pro 5G, Oppo F19 Pro+, Oppo K10 आणि Oppo A53s डिव्हाइसेसचा समावेश आहे. याशिवाय इतर डिव्हाइसेस देखील लवकरच अपग्रेड करण्यात येणार आहेत.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo