IQOO Z7s 5G नवा स्मार्टफोन लाँच, जाणून घ्या किमंत आणि टॉप 5 फीचर्स

IQOO Z7s 5G नवा स्मार्टफोन लाँच, जाणून घ्या किमंत आणि टॉप 5 फीचर्स
HIGHLIGHTS

iQOO Z7s 5G फोन भारतात लाँच

या फोनची सुरुवातीची किंमत 18,999 रुपये

फोन केवळ 24 मिनिटांच्या चार्जिंगमध्ये 0 ते 50 टक्के चार्ज होतो.

iQOO ने भारतात एक नवीन स्मार्टफोन iQOO Z7s 5G लाँच केला आहे. IQOO चा हा स्मार्टफोन Qualcomm च्या Snapdragon 695 प्रोसेसर सह सादर करण्यात आला आहे. यापूर्वी, कंपनीने मीडियाटेकच्या डायमेंसिटी 920 प्रोसेसरसह iQOO z7 स्मार्टफोन लाँच केला होता. बघुयात नव्या फोनची किमंत, सेल, ऑफर्स फीचर्स आणि स्पेक्स. 

IQOO Z7s 5G चे किंमत 

iQOO Z7s 5G फोनचा बेस व्हेरिएंट 6GB रॅम आणि 128GB स्टोरेज सह 18,999 रुपये किमतीत सादर करण्यात आला आहे. तर, फोनचा दुसरा व्हेरिएंट 8GB रॅम आणि 128GB स्टोरेज सह 19,999 रुपये किमतीत लाँच केला गेला आहे. स्मार्टफोन नॉर्वेजियन ब्लू आणि पॅसिफिक नाईट कलर यासह खरेदी करता येईल. 

फोनवरील सेल आणि ऑफर्स 

IQOO Z7s 5G फोन Amazon.in आणि iQOO.com वरून ऑनलाइन खरेदीसाठी उपलब्ध आहे. यासोबतच खरेदीदारांना ICICI बँक आणि HDFC बँक कार्डवरून पेमेंट केल्यास 1500 रुपयांची सूट मिळणार आहे. येथून खरेदी करा

टॉप 5 फीचर्स 

डिस्प्ले : स्मार्टफोनमध्ये 90Hz रिफ्रेश रेट आणि 360Hz टच सॅम्पलिंग रेटसह 6.38-इंच लांबीचा फुल HD+ AMOLED स्क्रीन आहे.

ऑपरेटिंग सिस्टम: iQOO Z7s 5G स्मार्टफोन Android 13 वर आधारित Funtouch OS 13 वर चालतो.

प्रोसेसर, रॅम आणि स्टोरेज : हा नवीनतम स्मार्टफोन Octa Core Snapdragon 695 8nm चिपसेटसह लाँच करण्यात आला आहे. फोनमध्ये 8GB पर्यंत LPDDR4x रॅम आहे. यासोबतच फोनमध्ये 128GB स्टोरेज देण्यात आले आहे. कंपनीने फोनमध्ये 1TB पर्यंत microSD कार्ड स्लॉट देखील दिला आहे.

बॅटरी : स्मार्टफोनमध्ये 4500mAh बॅटरी आहे, 44W फास्ट चार्ज सपोर्ट येणार आहे. हा फोन केवळ 24 मिनिटांच्या चार्जिंगमध्ये 0 ते 50 टक्के चार्ज होतो, असा कंपनीचा दावा आहे. 

कॅमेरा : फोनमध्ये 64MP रियर कॅमेरा आहे. फोनमध्ये 2MP डेप्थ कॅमेरा आहे. यासह LED फ्लॅश देण्यात आला आहे. फ्रंट कॅमेर्‍याबद्दल बोलायचे झाल्यास, यात 16MP सेल्फी कॅमेरा आहे.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo