अप्रतिम ऑफर ! 13,499 रुपयांमध्ये 50MP कॅमेरा असलेला iQOO फोन खरेदी करा, मिळेल सुपरफास्ट चार्जिंग

अप्रतिम ऑफर ! 13,499 रुपयांमध्ये 50MP कॅमेरा असलेला iQOO फोन खरेदी करा, मिळेल सुपरफास्ट चार्जिंग
HIGHLIGHTS

50MP कॅमेरा असलेला iQOO Z6 44W फोन

सध्या Amazon India वर स्मार्टफोनची किंमत एकूण 14,499 रुपये

स्मार्टफोन सध्या Amazon India वर अप्रतिम ऑफरसह उपलब्ध

जर तुम्ही 15,000 रुपयांपेक्षा कमी श्रेणीतील सर्वोत्तम स्मार्टफोन शोधत असाल, तर तुमच्यासाठी iQOO Z6 44W हा सर्वोत्तम हँडसेट ठरेल. हा फोन तुम्हाला Amazon India वरून उत्तम ऑफर्स आणि डिस्काउंटसह खरेदी करता येईल. फोनच्या 4 GB रॅम आणि 128 GB इंटरनल स्टोरेज व्हेरिएंटची किंमत सध्या Amazon India वर 14,499 रुपये आहे. तुम्ही ते खरेदी करताना ICICI बँक कार्डने पेमेंट केल्यास तुम्हाला 1,000 रुपयांची सवलत मिळेल. यासोबतच तुम्हाला एक्सचेंज ऑफर अंतर्गत या फोनवर 10,050 रुपयांपर्यंतची अतिरिक्त सूट देखील मिळेल. येथून खरेदी करा… 

 हे सुद्धा वाचा : 200 रुपयांपेक्षा कमी किमतीत Jioचे जबरदस्त प्लॅन्स, डेटा, कॉलिंगसह मिळतील अनेक ऍडिशनल बेनिफिट्स

iQOO Z6 44W चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स 

फोनमध्ये, कंपनी 2400×1080 पिक्सेल रिझोल्यूशनसह 6.44-इंच लांबीचा फुल HD + AMOLED डिस्प्ले देत आहे. हा डिस्प्ले 180Hz च्या टच सॅम्पलिंग रेटसह येतो. कंपनीचा हा फोन 8 GB पर्यंत रॅम आणि 128 GB इंटर्नल स्टोरेज पर्यायामध्ये उपलब्ध आहे. प्रोसेसर म्हणून कंपनी यामध्ये Snapdragon 680 चिपसेट देत आहे. फोटोग्राफीसाठी फोनच्या मागील बाजूस तीन कॅमेरे देण्यात आले आहेत.

यात 50-मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा, 2-मेगापिक्सेल मॅक्रोसह 2-मेगापिक्सेलचा बोकेह कॅमेरा समाविष्ट आहे. आकर्षक सेल्फीसाठी तुम्हाला या फोनमध्ये 16 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा पाहायला मिळेल. रेवेन ब्लॅक आणि ल्युमिना ब्लू कलर ऑप्शन्समध्ये येत असलेल्या या फोनमध्ये 5000mAh ची बॅटरी आहे. येथून खरेदी करा… 

फोनमध्ये दिलेली बॅटरी 44 W च्या फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सरने सुसज्ज असलेल्या या फोनमध्ये कनेक्टिव्हिटीसाठी Wi-Fi, ब्लूटूथ 5 आणि सर्व स्टॅंडर्ड ऑप्शन्स देण्यात आले आहेत. OS बद्दल बोलायचे झाले, तर हा फोन Android 12 वर आधारित Funtouch OS वर काम करतो.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo