चीनी स्मार्टफोन निर्माता iQoo ची बहुप्रतिक्षित iQoo 12 सिरीज पुढील महिन्यात लाँच होणार आहे. विशेष म्हणजे यामध्ये Qualcomm चा नवीन Snapdragon 8 Gen 3 SoC प्रोसेसर दिला जाईल. यात Android 14 ऑपरेटिंग सिस्टम असू शकते. भारतातील iQoo चे CEO Nipun Marya यांनी X वर एका पोस्टद्वारे iQoo 12 5G सादर करण्याबाबत माहिती दिली आहे. या सिरीजमधील स्मार्टफोनमध्ये PUBG Mobile, PUBG New State आणि Genshin Impact सारखे गेम खेळले जाऊ शकतात.
iQOO 12 चा नवीन टीझर कंपनीच्या अधिकृत हँडलने मायक्रो ब्लॉगिंग साइट Weibo वर देखील सादर केला आहे. 7 नोव्हेंबर रोजी हा डिवाइस लाँच होणार असल्याची पुष्टी झाली आहे. हा मोबाइल चीनमध्ये ऑनलाइन इव्हेंटद्वारे संध्याकाळी 7:00 वाजता लाँच केला जाईल. iQOO 12 सीरीजमध्ये दोन मोबाईल सादर केले जाऊ शकतात.
iQOO 12 चे संभावित फीचर्स
iQOO 12 फ्लॅगशिप डिव्हाइसमध्ये फ्लॅट E7 AMOLED पॅनल दिले जाऊ शकते. या स्क्रीनवर 144Hz रिफ्रेश रेट आणि 2K रिझोल्यूशन ऑफर केले जाऊ शकते. ब्रँडने पुष्टी केली आहे की, हा मोबाइल क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 8 जेन 3 चिपसेटसह येईल. आगामी फोनमध्ये 16 GB LPDDR5x RAM + 512 GB पर्यंत UFS 4.0 अंतर्गत स्टोरेज मिळू शकते.
iqoo 12
फोटोग्राफीसाठी, iQOO 12 मध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप मिळण्याची अपेक्षा आहे. हे 50MP Omnivision OV50H सेन्सर, 50MP ISOCELL JN1 वाइड अँगल लेन्स आणि 3X ऑप्टिकल झूमसह अन्य 64MP लेन्स मिळण्याची शक्यता आहे. डिव्हाइस मोठ्या 5000mAh आणि शक्तिशाली 100W जलद चार्जिंग तंत्रज्ञानासह येऊ शकतो.
Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile