अवघ्या दोन दिवसांत Amazon चा ग्रेट समर सेल सुरू होणार आहे. iQOO 11 सेल दरम्यान उत्तम ऑफर्ससह आणण्यात येणार आहे, अशी माहिती मिळाली आहे. नव्या सेलमध्ये, हे मॉडेल एक स्वस्त फ्लॅगशिप स्मार्टफोन म्हणून आणले जात आहे. फोनमध्ये तुम्हाला स्नॅपड्रॅगन 8 Gen 2 SoC मिळणार आहे. यात 6.78-इंच लांबीचा E6 AMOLED डिस्प्ले मिळत आहे, जो 120Hz रिफ्रेश रेट ऑफर करतो.
Survey
✅ Thank you for completing the survey!
किंमत आणि ऑफर्स :
चीनी स्मार्टफोन निर्मात्याने फोनचे 8GB + 256GB मॉडेल 59,999 रुपयांच्या सुरुवातीच्या किमतीत सादर केले होते.डिव्हाइस सध्या Amazon वर 54,990 रुपयांना सूचीबद्ध आहे. Amazon ग्रेट समर सेल दरम्यान प्रीमियम हँडसेट 49,999 रुपयांमध्ये ऑफर केला जाईल. या किंमतीमध्ये सवलत आणि विविध ऑफर्स समाविष्ट आहेत.
HDFC बँक आणि ICICI क्रेडिट कार्डधारकांना सेलमध्ये 3000 रुपयांची सूट मिळू शकते. अशा प्रकारे फोनची किंमत 49,990 रुपयांपर्यंत खाली येईल.
मुख्य फीचर्स आणि स्पेक्स
डिव्हाइस एक समर्पित V2 चिपसेटसहा सुसज्ज आहे, जो गेमिंग परफॉर्मन्स सुधारतो. फोन Android 13 वर आधारित Funtouch OS 13 सह सादर केला गेला आहे. फोटोग्राफीसाठी मागील पॅनलवर 50MP चा ट्रिपल कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. सेल्फीसाठी 16-मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आहे. त्याबरोबरच, 120W फास्ट चार्जिंग सपोर्ट देखील फोनसोबत मिळणार आहे.
Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile