HIGHLIGHTS
Apple iPhone 14 Plus डिस्काउंटसह उपलब्ध
फोनच्या खरेदीवर 33 हजार रुपयांची एक्सचेंज ऑफर
HDFC बँकेच्या डिस्काउंट ऑफरमध्ये 4000 रुपयांची सूट
Apple च्या iPhone 14 Plus जबरदस्त स्मार्टफोन कमी किमतीत खरेदी करण्याची संधी आली आहे. ही संधी इ-कॉमर्स प्लॅटफॉर्म Flipkart वर मिळत आहे. त्यामुळे हा स्मार्टफोन खरेदी करण्याची हीच योग्य वेळ आहे. हा फोन मागील वर्षी सप्टेंबरमध्ये लाँच करण्यात आला होता. तर नव्या सिरीजची लॉन्चिंग येत्या सप्टेंबरमध्ये होण्याची शक्यता आहे. त्या आधी आताचे iPhones सवलतीसह उपलब्ध होताना दिसत आहेत.
SurveyApple iPhone 14 Plus ची Flipkartवर MRP किंमत 89,999 रुपये आहे. मात्र, 9 टक्के डिस्काउंटनंतर हा फोन ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म फ्लिपकार्टवर 80,999 रुपयांना सूचिबद्ध करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, फोनच्या खरेदीवर 33 हजार रुपयांची एक्सचेंज ऑफर दिली जाणार आहे. त्याबरोबरच, काही निवडक मॉडेल्सवर 3000 रुपयांची अतिरिक्त एक्सचेंज ऑफर देखील दिली जाणार आहे.
एक्सचेंज ऑफरचा संपूर्ण लाभ मिळवल्यास iPhone 14 ची किंमत 44,999 रुपयांपर्यंत खाली येईल. हा फोन फ्लिपकार्ट Axis बँक क्रेडिट कार्डवरून 5% कॅशबॅकसह खरेदी करता येणार आहे. आणखी बँक ऑफर्सबद्दल बोलायचे झाल्यास, HDFC बँकेच्या डिस्काउंट ऑफरमध्ये 4000 रुपयांची सूट मिळणार आहे.
Apple iPhone14 Plus फोनमध्ये 6.7-इंच लांबीचा सुपर रेटिना XDR डिस्प्ले आहे. फोन 6nm आधारित A15 बायोनिक चिपसेट सपोर्टसह येतो. त्याबरोबरच, फोनमध्ये 12 MP चा डुअल कॅमेरा सेटअप आहे. तर फोनच्या फ्रंटमध्ये 12MP कॅमेरा सेन्सर देखील उपलब्ध आहे. वरील सर्व ऑफर्स फोनच्या 128GB स्टोरेज व्हेरिएंटवर उपलब्ध आहेत.
Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile