Apple लव्हर्स ! 15 हजारांच्या सवलतीत लेटेस्ट iPhone खरेदी करण्याची संधी, ऑफर पुन्हा मिळणे नाही

Apple लव्हर्स ! 15 हजारांच्या सवलतीत लेटेस्ट iPhone खरेदी करण्याची संधी, ऑफर पुन्हा मिळणे नाही
HIGHLIGHTS

iPhone 14 प्रचंड सवलतीसह उपलब्ध

या फोनवर तब्बल 15 हजारांपर्यंत सूट दिली जात आहे.

ही भारी ऑफर फ्लिपकार्टवर दिली जात आहे.

Apple लव्हर्ससाठी एक आनंदाची बातमी आहे. नवीनतम iPhone 14 खरेदी करण्याचा विचार करत असाल तर, तुम्ही आता भरपूर मोठी बचत शकता. आम्ही तुम्हाला सांगतो की, लेटेस्ट iPhone फ्लिपकार्टवर मोठ्या सवलतीसह उपलब्ध आहे. या फोनवर तब्बल 15 हजारांपर्यंत सूट दिली जात आहे. बघुयात सविस्तर- 

iPhone 14 ची भारतीय किंमत आणि ऑफर्स 

Apple चा लेटेस्ट  iPhone म्हणेजच  iPhone 14चा 128GB व्हेरिएंट 79,999 रुपयांमध्ये लाँच करण्यात आलेला आहे. पण,  हा फोन 11% डिस्काउंटसह केवळ 68,999 रुपयांना खरेदीसाठी उपलब्ध करून देण्यात आला आहे. 

iPhone 14 128GB व्हेरिएंट लाँच किंमतीपेक्षा 11,000 स्वस्त दरात सूचीबद्ध केले गेले आहे, तसेच बँक कार्ड्सवर 4,000 सूट मिळाल्यानंतर, तुम्हाला या डिव्हाइसवर एकूण 15,000 रुपयांची थेट सूट मिळेल. म्हणजेच 79,900 रुपयांचा हा फोन 64,999 रुपयांना तुमचा होईल. अधिक माहितीसाठी फ्लिपकार्टला भेट द्या. 

iPhone 14 चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स  

iPhone 14 मध्ये 6.1-इंच लांबीचा सुपर रेटिना XDR डिस्प्ले आहे, जो 1170×2532 पिक्सेल रिझोल्यूशन आणि 460 PPI सह येतो. डिस्प्लेसह, 1,200 निट्स पीक ब्राइटनेस आणि ऑल्वेज ऑन डिस्प्लेसाठी सपोर्ट प्रदान करण्यात आला आहे. iPhone 14 मध्ये A15 बायोनिक प्रोसेसर देण्यात आला आहे, जो 5 कोर GPU सह येतो. iPhone 14 मध्ये 12-मेगापिक्सलचा रियर कॅमेरा सेटअप आणि 12-मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा आहे. iPhone  सह ई-सिम आणि सॅटेलाइट कनेक्टिव्हिटीसाठी समर्थन देखील उपलब्ध आहे.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo