मोठी बातमी ! iPhone 14 देखील ‘मेड इन इंडिया’ असेल, भारतात मॅनुफॅक्चरिंग सुरु…

मोठी बातमी ! iPhone 14 देखील ‘मेड इन इंडिया’ असेल, भारतात मॅनुफॅक्चरिंग सुरु…
HIGHLIGHTS

भारतात iPhone 14 चे प्रोडक्शन सुरु

Foxconn भारतात त्यांच्या चेन्नई प्लांटमध्ये iPhone 14 चे प्रोडक्शन करेल.

फॉक्सकॉन ही जगातील सर्वात मोठी इलेक्ट्रॉनिक कॉन्ट्रॅक्टर आहे.

Apple ने भारतात आपल्या नवीन iPhone 14 चे प्रोडक्शन देखील सुरु केले आहे. Apple ने भारतात पहिल्यांदा iPhone SE चे प्रोडक्शन 2017 मध्ये सुरू केले आणि त्यानंतर iPhone 12, iPhone 13 आणि iPhone 14 चे प्रोडक्शन सुरू झाले. या महिन्याच्या सुरुवातीला Apple ने iPhone 14 सीरीज अंतर्गत चार नवीन iPhone लाँच केले. iPhone 14 मध्ये सॅटेलाइट कनेक्टिव्हिटी आणि क्रॅश डिटेक्शन ही नवीन फीचर्स देण्यात आली आहेत.

हे सुद्धा वाचा : Jio चा पैस वसूल प्लॅन ! 1559 रुपयांमध्ये 336 दिवसांची वैधता, इतर स्वस्त प्लॅन्स देखील बघा

मेड इन इंडिया iPhone 14 लवकरच बाजारात येईल. मेड इन इंडिया iPhone 14 भारतात विकला जाईल आणि निर्यातही केला जाईल. Apple चे भागीदार Foxconn भारतात त्यांच्या चेन्नई प्लांटमध्ये iPhone 14 चे प्रोडक्शन करेल. आम्ही तुम्हाला सांगतो की फॉक्सकॉन ही जगातील सर्वात मोठी इलेक्ट्रॉनिक कॉन्ट्रॅक्टर आहे.

iphone 14

आम्ही तुम्हाला सांगतो की, 7 सप्टेंबर रोजी Apple ने चार नवीन iPhone लॉन्च केले आहेत. ज्यात iPhone 14, iPhone 14 Plus, iPhone 14 Pro आणि iPhone 14 Pro Max यांचा समावेश आहे. भारतात iPhone 14 ची सुरुवातीची किंमत 79,900 रुपये आहे. 128GB स्टोरेज मॉडेल या किंमतीत उपलब्ध असेल. iPhone 14, iPhone 14 Plus मध्ये A15 चिपसेट देण्यात आला आहे, जो iPhone 13 मध्ये देखील आहे. तर iPhone 14 Pro आणि iPhone 14 Pro Max नवीन चिपसेट A16 Bionic सह लाँच करण्यात आला आहे.

मेड इन इंडिया iPhone 

काही दिवसांपूर्वी  J.P.Morgan च्या एका अहवालात म्हटले होते की, पुढील तीन वर्षांत म्हणजे 2025 पर्यंत भारतात iPhone चे उत्पादन मोठ्या प्रमाणावर होणार आहे. आम्ही तुम्हाला सांगतो की Apple ने 2017 मध्ये विस्ट्रॉनच्या मदतीने भारतात iPhone ची निर्मिती केली होती आणि नंतर फॉक्सकॉन देखील भारतात iPhone तयार करत आहे.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo