Infinix चा सर्वात पावरफुल 200MP कॅमेरासह फोन लाँच, अवघ्या 12 मिनिटात पूर्ण चार्ज होईल…

Infinix चा सर्वात पावरफुल 200MP कॅमेरासह फोन लाँच, अवघ्या 12 मिनिटात पूर्ण चार्ज होईल…
HIGHLIGHTS

Infinix चा सर्वात पावरफुल स्मार्टफोन Infinix Zero Ultra भारतात लाँच

हा फोन 25 डिसेंबरपासून फ्लिपकार्टवरून खरेदी करता येईल.

स्मार्टफोनची प्रास्ताविक किंमत 29,999 रुपये आहे

Infinix ने भारतात आपला सर्वात पावरफुल स्मार्टफोन Infinix Zero Ultra लॉन्च केला आहे. या फोनमध्ये अनेक अप्रतिम फीचर्स उपलब्ध आहेत. Infinix चा हा पहिला स्मार्टफोन आहे, जो 200MP कॅमेरा सेन्सरसह येतो. फोनमध्ये 6.8-इंचाचा 3D कर्व FHD + 120Hz AMOLED डिस्प्ले आहे. फोनसोबत 180W फास्ट चार्जिंग पॉवर ऍडॉप्टर देण्यात आला आहे, जो 12 मिनिटांत फोन शून्य ते 100 टक्के चार्ज करतो.

हे सुद्धा वाचा : अप्रतिम ऑफर ! Xiaomi 12 Pro आणि Redmi K50i वर भारी सूट

स्पेसिफिकेशन्स : 

फोनमध्ये 6.8-इंचाचा AMOLED डिस्प्ले आहे. त्याचे चित्र रिझोल्यूशन 2400 × 1080 पिक्सेल आहे. फोनला फुल एचडी प्लस 3D डिस्प्ले देण्यात आला आहे. फोनमध्ये 120Hz रिफ्रेश रेट सपोर्ट आणि 360Hz टच सॅम्पलिंग रेट सपोर्ट आहे. हा फोन गोरिल्ला ग्लास 3 प्रोटेक्शन सह येतो.

फोनमध्ये डायमेंसिटी 920 SoC चिपसेट सपोर्ट देण्यात आला आहे. यात 5GB रॅमसह एकूण 8GB रॅम आहे. हा फोन XOS 12 आधारित Android 12 वर चालतो. फोनला 2 वर्षांसाठी सिक्युरिटी अपडेट्स आणि 1 अँड्रॉइड अपडेट देण्यात आला आहे.

फोनच्या मागील बाजूस 200MP रियर कॅमेरा, ऑटो फोकससह 13MP अल्ट्रा-वाइड कॅमेरा आणि 2MP कॅमेरा सेन्सर आहे. तर सेल्फीसाठी 32MP कॅमेरा देण्यात आला आहे. Infinix Zero Ultr स्मार्टफोनमध्ये 4500mAh बॅटरी आहे. फोनला ओव्हर हिटिंग आणि ओव्हर लोडपासून वाचवण्यासाठी मल्टिपल लेयर कुलिंग देण्यात आले आहे. चार्जरमध्ये GaN तंत्रज्ञानासह 180W चा चार्जर आहे. फ्युरियस मोड फास्ट चार्जिंग ऑफर करतो.

किंमत आणि ऑफर :  

Infinix ZERO ULTRA Coslight Silver आणि Genesis Noir या दोन रंगांच्या पर्यायांमध्ये येतो. हे ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म फ्लिपकार्टवरून खरेदी करता येतील. त्याची किंमत 29,999 रुपये आहे. हा फोन 25 डिसेंबरपासून खरेदी करता येईल. ही फोनची प्रास्ताविक किंमत आहे.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo