108MP कॅमेरासह Infinix Note 40 5G फोन भारतात लाँच, कमी किमतीत मिळतील जबरदस्त फीचर्स
Infinix चा Infinix Note 40 5G स्मार्टफोन भारतात अखेर लाँच
Infinix Note 40 5G फोनची विक्री Flipkart वर 26 जून 2024 रोजी दुपारी 12 वाजता सुरू होईल.
पहिल्या सेलमध्ये Infinix Note 40 5G फोनवर 2000 रुपयांचा बँक डिस्काउंट मिळेल.
प्रसिद्ध स्मार्टफोन निर्माता Infinix ने Infinix Note 40 5G स्मार्टफोन भारतात अखेर लाँच करण्यात आला आहे. लेटेस्ट Infinix स्मार्टफोनची चर्चा मागील काही काळापासून सुरु होती. हा हँडसेट वायरलेस चार्जिंग सपोर्टसह येतो. हा फोन बेझल लेस डिझाइनसह लॉन्च करण्यात आला आहे. विशेष स्पेक्सबद्दल बोलायचे झाल्यास, हा फोन 108MP मेन कॅमेरा सारख्या फीचर्ससह लाँच करण्यात आला आहे. जाणून घ्या Infinix Note 40 5G फोनची किंमत आणि सर्व स्पेसिफिकेशन्स-
SurveyAlso Read: Airtel New Plan: कंपनीने अगदी कमी किमतीत लाँच केला नवा प्लॅन, किंमत 10 रुपयांपेक्षा कमी। Tech News
Infinix Note 40 5G ची भारतात किंमत
120Hz AMOLED display wala NOTE 40 5G lelo…
— Infinix India (@InfinixIndia) June 21, 2024
uski reels better quality me dekh paoge 💖
Sale starts 26th June
Get it at 15,999* or 1,333/month* https://t.co/GvQGVhjQWr #InfinixNote405G #InfinixIndia
Infinix कंपनीने लेटेस्ट Infinix Note 40 5G स्मार्टफोन 19,999 रुपयांना लाँच केला आहे. Infinix Note 40 5G फोनची विक्री Flipkart वर 26 जून 2024 रोजी दुपारी 12 वाजता सुरू होईल. ऑफर्सबद्दल बोलायचे झाल्यास, पहिल्या सेलमध्ये फोनवर 2000 रुपयांचा बँक डिस्काउंट मिळेल. ही ऑफर HDFC, ICICI, SBI आणि Axis बँक कार्डद्वारे पेमेंट व्यवहार केल्यास मिळेल. या फोनमध्ये ऑब्सिडियन ब्लॅक आणि टायटन गोल्ड कलर ऑप्शन्सचा समावेश आहे.
Infinix Note 40 5G चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स
Infinix Note 40 5G स्मार्टफोनमध्ये 6.78 इंच लांबीचा फुल HD+ AMOLED डिस्प्ले आहे, ज्याचा रिफ्रेश रेट 120Hz इतका आहे. स्पीड आणि मल्टीटास्किंगसाठी, या फोनमध्ये MediaTek Dimensity 7020 6nm प्रोसेसर उपलब्ध आहे. स्टोरेजबद्दल बोलायचे झाल्यास, या स्मार्टफोनमध्ये 8GB रॅमसह 256GB इंटरनल स्टोरेज देण्यात आले आहे. त्याबरोबरच, यात मायक्रो SD कार्डच्या मदतीने स्टोरेज 1TB पर्यंत वाढवता येईल.
फोटोग्राफीसाठी फोनच्या मागील बाजूस 108MP मुख्य कॅमेरा देण्यात आला आहे. यासोबतच 2MP मॅक्रो लेन्स आणि डेप्थ लेन्स उपलब्ध आहेत. आकर्षक सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी फोनच्या पुढील बाजूस 32MP फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. फोनमध्ये 5000mAh बॅटरी आहे, जी 33W फास्ट चार्जिंगला सपोर्टसह येते. हा फोन 15W वायरलेस मॅगचार्जला देखील सपोर्ट करतो. इतर फीचर्सबद्दल बोलायचे झाल्यास, फोनमध्ये लॉक आणि अनलॉकसाठी इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर आहे. यात JBL पॉवर्ड ड्युअल स्पीकर आहेत.
Reshma Zalke
Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile