अलीकडेच प्रसिद्ध स्मार्टफोन निर्माता Infinix ने Infinix Note 40 5G हा कंपनीचा नवीनतम स्मार्टफोन लाँच केला आहे. या डिव्हाइसची पहिली विक्री आज म्हणजेच 26 जून रोजी Flipkart वर दुपारी 2 वाजल्यापासून सुरू होईल. पहिल्या सेलदरम्यान स्मार्टफोनवर बँक डिस्काउंटपासून ते कॅशबॅक आणि नो-कॉस्ट EMI पर्यंत सर्व काही फोनवर उपलब्ध असेल. चला तर मग जास्त वेळ न घालवता जाणून घेऊयात Infinix Note 40 5G च्या पहिल्या सेलमधील ऑफर्स-
Infinix Note 40 5G एकाच 8GB + 256GB स्टोरेज व्हेरिएंटमध्ये सादर करण्यात आला आहे. या स्मार्टफोनची किंमत 19,999 रुपये इतकी निश्चित केली गेली आहे. पहिल्या सेलमधील ऑफर्सबद्दल बोलायचे झाल्यास, यात Axis, HDFC, ICICI आणि SBI बँकेच्या क्रेडिट कार्डद्वारे केलेल्या खरेदीवर 2000 रुपयांची सूट दिली जात आहे. फोनवर मासिक विनाखर्च EMI 1,667 रुपयांमध्ये उपलब्ध आहे. त्याबरोबरच, यासह 5% कॅशबॅक देखील उपलब्ध आहे. Buy From Here
Infinix Note 40 5G चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स
Infinix Note 40 5G Android 14 वर आधारित XOS 14 ऑपरेटिंग सिस्टमवर काम करते. या स्मार्टफोनमध्ये 6.78 इंच लांबीचा फुल HD+AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे, ज्याचा रिफ्रेश रेट 120Hz आहे. स्पीड आणि मल्टीटास्किंगसाठी या फोनमध्ये MediaTek Dimensity 7020 प्रोसेसर उपलब्ध आहे. फोनचे स्टोरेज मायक्रो SD कार्डच्या मदतीने वाढवता येईल. सिक्योरिटीसाठी या फोनमध्ये फिंगरप्रिंट सेन्सर आणि फेस अनलॉक फीचर सुद्धा मिळेल.
फोटोग्राफीसाठी Infinix Note 40 मध्ये ड्युअल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. या सेटअपमध्ये 108MP मेन लेन्स आणि 2MP मॅक्रो सेन्सर समाविष्ट आहे. आकर्षक सेल्फीसाठी फोनच्या पुढील बाजूस 32MP फ्रंट कॅमेरा आहे. बॅटरीबद्दल बोलायचे झाल्यास, या डिव्हाइसमध्ये 5000mAh बॅटरी आहे, जी 33W फास्ट चार्जिंग आणि 15W वायरलेस मॅगचार्ज फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. कनेक्टिव्हिटीसाठी Wi-Fi, GPS, ब्लूटूथ, ड्युअल सिम स्लॉट आणि USB टाइप-C पोर्ट देण्यात आला आहे.
Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile