Infinix Note 12 5G फक्त 2,499 रुपयांमध्ये खरेदी करण्याची संधी, पहिल्या सेलमध्ये मिळतेय प्रचंड सूट

Infinix Note 12 5G फक्त 2,499 रुपयांमध्ये खरेदी करण्याची संधी, पहिल्या सेलमध्ये मिळतेय प्रचंड सूट
HIGHLIGHTS

Infinix Note 12 5G ची पहिली विक्री आज

स्मार्टफोन दुपारी 12 वाजता फ्लिपकार्टवर विक्रीसाठी उपलब्ध होणार

ऑफरअंतर्गत, फोन केवळ 2,499 रुपयांमध्ये खरेदी करण्याची संधी

जर तुम्हाला स्वस्त किंमतीत पॉवरफुल स्मार्टफोन हवे असेल, तर Infinix चा नवीनतम स्मार्टफोन – Infinix Note 12 5G हा एक उत्तम पर्याय ठरू शकतो. आज कंपनीच्या या लेटेस्ट स्मार्टफोनची पहिली सेल आहे. दुपारी 12 वाजल्यापासून तुम्ही हा फोन ऑनलाईन शॉपिंग प्लॅटफॉर्म फ्लिपकार्टवरून खरेदी करू शकता. हा फोन 6 GB रॅम आणि 64 GB अंतर्गत स्टोरेज ऑप्शनमध्ये येतो. त्याची किंमत 14,999 रुपये आहे. पहिल्या सेलमध्ये अनेक आकर्षक ऑफर्ससह फोन खरेदी करता येईल. एक्सचेंज डीलमध्ये, हा फोन केवळ 2,499 रुपयांमध्ये तुमचा असू शकतो. फोन खरेदी करताना तुम्ही ऍक्सिस बँकेच्या कार्डने पेमेंट केल्यास तुम्हाला 1,500 रुपयांची सूट मिळेल.

हे सुद्धा वाचा : TATA PLAY : 'या' प्लॅनमध्ये मिळेल फास्ट स्पीडमध्ये अनलिमिटेड इंटरनेट आणि फ्री कॉलिंग, किंमत 600 रुपयांपेक्षा कमी

याशिवाय, जर तुमच्याकडे SBI क्रेडिट कार्ड असेल तर तुम्हाला 750 रुपयांपर्यंत सूट मिळण्याची शक्यता आहे. तुम्ही SBI कार्डने EMI व्यवहार केल्यास, हा फोन तुम्हाला 1,500 रुपयांपर्यंत स्वस्त पडेल. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही हा लेटेस्ट 5G स्मार्टफोन Infinix वरून 12,500 रुपयांपर्यंतच्या एक्सचेंज ऑफरसह खरेदी करता येईल. जुन्या फोनची फुल एक्सचेंज व्हॅल्यू मिळाल्यावर, Infinix Note 12 5G तुमच्याकडे 14,999 रुपयांऐवजी फक्त 2,499 रुपयांमध्ये मिळू शकेल.

infinix note 12 5g

Infinix Note 12 चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स 

कंपनी फोनमध्ये 6.7-इंच लांबीचा फुल HD + AMOLED डिस्प्ले देत आहे. फोन 6GB रॅम आणि 64GB इंटर्नल  स्टोरेज ऑप्शनमध्ये येतो. यामध्ये कंपनी 3 GB पर्यंत व्हर्चुअल रॅम देखील देत आहे. ज्यामुळे फोनची रॅम 9 GB पर्यंत वाढते. फोनमध्ये MediaTek Dimension 810 5G प्रोसेसर देण्यात आला आहे. फोटोग्राफीसाठी फोनच्या मागील बाजूस LED फ्लॅशसह तीन कॅमेरे देण्यात आले आहेत.

यामध्ये 2-मेगापिक्सेल अल्ट्रा-वाइड अँगल लेन्स आणि AI लेन्ससह 50-मेगापिक्सेलचा प्रायमरी कॅमेरा समाविष्ट आहे. त्याचबरोबर, आकर्षकी सेल्फीसाठी फोनमध्ये 16-मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा दिलेला आहे. याव्यतिरिक्त, यामध्ये 5000mAh बॅटरी आहे, जी 33W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. OS बद्दल बोलायचे झाले, तर हा फोन Android 12 वर आधारित XOS 10.6 वर काम करतो.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo