Infinix चा नवा दमदार फोन 50MP कॅमेरासह लाँच, सुरुवातीची किंमत 10 हजारांपेक्षा कमी

HIGHLIGHTS

Infinix Hot 12 Pro भारतात लाँच

नवीन हँडसेट 6 GB + 64 GB आणि 8 GB + 128 GB या दोन व्हेरिएंटमध्ये उपलब्ध

स्मार्टफोनची सुरुवातीची किंमत 10 हजारा रुपयांपेक्षा कमी

Infinix चा नवा दमदार फोन 50MP कॅमेरासह लाँच, सुरुवातीची किंमत 10 हजारांपेक्षा कमी

Infinix ने भारतीय वापरकर्त्यांसाठी नवीन बजेट स्मार्टफोन 'Infinix Hot 12 Pro' लाँच केला आहे. कंपनीचा हा नवीन हँडसेट 6 GB + 64 GB आणि 8 GB + 128 GB या दोन व्हेरिएंटमध्ये येतो. 6 GB रॅम सह Infinix Hot 12 Pro ची किंमत 9,999 रुपये आहे. तसेच, 8 GB साठी तुम्हाला 10,999 रुपये खर्च करावे लागतील. फोनची विक्री 8 ऑगस्टपासून फ्लिपकार्टवर सुरू होणार आहे. Infinix चा हा हँडसेट 50MP कॅमेरा आणि 90Hz डिस्प्ले सारख्या  उत्तम फीचर्सने सुसज्ज आहे.

Digit.in Survey
✅ Thank you for completing the survey!

हे सुद्धा वाचा : BSNL चे हे प्लॅन्स JIO वर भारी ! कमी किमतीत मिळेल दुप्पट डेटा आणि अनेक फायदे 

infinix hot 12 pro

Infinix Hot 12 Pro चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स 

फ्लॅट एज फ्रेम आणि मॅट फिनिशसह येणाऱ्या या फोनमध्ये तुम्हाला 6.6-इंच लांबीचा फ्लुइड ड्रॉप नॉच गेमिंग डिस्प्ले मिळेल. डिस्प्ले HD+ रिझोल्युशनसह येतो. फोनमध्ये दिलेल्या या डिस्प्लेचा रिफ्रेश रेट 90Hz आहे आणि टच सॅम्पलिंग रेट 180Hz आहे. कंपनीचा दावा आहे की, हा फोन या सेगमेंटमध्ये सर्वात ब्राइट डिस्प्ले देतोय. फोन 8GB पर्यंत LPDDR 4X RAM आणि 128GB पर्यंत UFS 2.2 स्टोरेजने सुसज्ज आहे.

infinix hot 12 pro

फोनच्या 6 GB वेरिएंटमध्ये 3 GB व्हर्च्युअल रॅम सपोर्ट देखील देण्यात आला आहे. ज्यामुळे त्याची एकूण रॅम 9 GB झाली आहे. त्याचप्रमाणे, 8 GB वेरिएंटमध्ये तुम्हाला 5 GB अतिरिक्त व्हर्च्युअल रॅम मिळेल, ज्यामुळे त्याची एकूण RAM 13 GB पर्यंत वाढते. प्रोसेसर म्हणून, Infinix च्या या फोनमध्ये octa-core UniSoc T616 चिपसेट आहे. फोटोग्राफीसाठी फोनच्या मागील बाजूस ड्युअल LED फ्लॅशसह 50MP AI ड्युअल कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे.  

आकर्षक सेल्फीसाठी, तुम्हाला या फोनमध्ये 8 मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा पाहायला मिळेल, जो ड्युअल LED  फ्लॅशसह येतो. यामध्ये 5000mAh ची बॅटरी देण्यात आली आहे, जी 18W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करेल. कंपनीच्या मते, या बॅटरीचा स्टँडबाय टाइम 45 दिवसांपर्यंत आहे.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo