आयबॉलने आपला नवीन स्मार्टफोन iBall Andy 5.5H weber लाँच केला आहे. ह्या स्मार्टफोनमध्ये ५.५ इंचाची डिस्प्ले दिली आहे आणि ह्याची किंमत ६,४९९ रुपये ठेवण्यात आली आहे.
आयबॉलने अधिकृतरित्या आपला नवीन स्मार्टफोन iBall Andy 5.5H weber त्याचबरोबर ह्याला थर्ड पार्टी ऑनलाइन रिटेलरच्या माध्यमातून ६,४९९ रुपयात विकले जाईल. iBall Andy 5.5H weber ला आता रिटेलर्सच्या माध्यमातूनही घेऊ शकता.
Survey
✅ Thank you for completing the survey!
ह्या स्मार्टफोनच्या वैशिष्ट्यांविषयी बोलायचे झाले तर, ह्या स्मार्टफोनमध्ये ड्यूल सिम सपोर्ट दिला गेला आहे. त्याचबरोबर हा अॅनड्रॉईड 5.1 लॉलीपॉपवर आधारित आहे. स्मार्टफोनमध्ये ५.५ इंचाची HD 720×1280 पिक्सेलची IPS डिस्प्ले दिली गेली आहे. स्मार्टफोनमध्ये 1.3GHz क्वाड-कोर प्रोसेसर दिला गेला आहे आणि ह्यात 1GB ची रॅम दिली गेली आहे. iBall Andy 5.5H weber स्मार्टफोनमध्ये 8GB चे अंतर्गत स्टोरेजसुद्धा दिले गेले आहे, ज्याला आपण मायक्रो-एसडी कार्डच्या साहाय्याने 32GB पर्यंत वाढवू शकतो.
फोटोग्राफीसाठी स्मार्टफोनमध्ये ८ मेगापिक्सेलचा रियर कॅमेरा ड्यूल LED फ्लॅश दिला गेला आहे. त्याशिवाय स्मार्टफोनमध्ये ५ मेगापिक्सेलचा फ्रंट फेसिंग कॅमेरासुद्धा दिला गेला आहे.
तसेच कनेक्टिव्हिटीसाठी ह्यात 3G, GPRS/EDGE, वायफाय 802.11 b/g/n, मायक्रो-USB आणि ब्लूटुथसुद्धा आहे. स्मार्टफोनमध्ये आपल्याला 2200mAh क्षमतेची बॅटरीसुद्धा मिळत आहे. त्याचबरोबर हा २१ क्षेत्रीय भाषांना सपोर्ट करतो.