हुआवे नेक्सस 6P स्मार्टफोन फ्लिपकार्टवर 32GB आणि 64GB मेमरीसोबत उपलब्ध होईल. ज्याची किंमत क्रमश: ३९,९९९ रुपये आणि ४२,९९९ रुपये आहे. त्याचबरोबर ऑफलाईन स्टोरमध्ये हा फोन संगिथा मोबाईल, रिलायन्स डिजिटल, क्रोमा स्टोर, दी मोबाईल स्टोर पूर्विका मोबाईल आणि ईझोनसह उपलब्ध होईल.
गुगलने १३ ऑक्टोबरला भारतात आपले दोन स्मार्टफोन्स एलजी नेक्सस 5X आणि हुआवे नेक्सस 6P ला लाँच केले होते. जेथे एका बाजूला कंपनीने २१ ऑक्टोबरला एलजी नेक्सस 5X ला सेलसाठी उपलब्ध केले होते. आता कंपनीने अशी घोषणा केली आहे की, नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात नेक्सस 6P ची डिलिवरी सुरु केली जाईल. हुआवे नेक्सस 6P १३ ऑक्टोबरपासूनच ऑनलाईन शॉपिंग स्टोर फ्लिपकार्ट व्यतिरिक्त काही इतर रिटेल साखळीच्या माध्यमातून प्री-ऑर्डर बुक केले होते.
हुआवे नेक्सस 6P स्मार्टफोन फ्लिपकार्टवर ३२जीबी आणि ६४जीबी मेमरीसोबत उपलब्ध आहे. ज्याची किंमत क्रमश: ३९,९९९ रुपये आणि ४२,९९९ रुपये आहे. त्याचबरोबर ऑफलाईन स्टोरमध्ये हा फोन संगिथा मोबाईल, रिलायन्स डिजिटल, क्रोमा स्टोर, दी मोबाईल स्टोर पूर्विका मोबाईल आणि ईझोनसह उपलब्ध होईल.
हुआवे नेक्सस 6P च्या वैशिष्ट्यांविषयी बोलायचे झाले तर, ह्या स्मार्टफोनमध्ये ५.७ इंचाची QHD डिस्प्ले दिली गेली आहे, ज्याचे रिझोल्युशन १४४०x२५६० पिक्सेल आहे आणि हे कॉर्निंग गोरिल्ला ग्लास ४ ने सुरक्षित सुद्धा आहे. हा स्मार्टफोन 2GHz ऑक्टा-कोर क्वालकॉम स्नॅपड्रॅगन ८१० प्रोसेसर आणि ३जीबी रॅमने सुसज्ज आहे.
ह्या स्मार्टफोनमध्ये f/2.0 अपर्चर असलेला १२.३ मेगापिक्सेलचा रियर कॅमेरा दिला गेला आहे, ज्याचे रिझोल्युशन 4k आहे आणि ह्या स्मार्टफोनमध्ये ८ मेगापिक्सेलचा फ्रंट फेसिंग कॅमेरासुद्धा दिला गेला आहे. हा पहिला पुर्ण धातूचा स्मार्टफोन आहे, जो अॅल्युमिनियमने बनलेला आहे. त्याशिवाय हुआवे नेक्सस 6P स्मार्टफोनमध्ये ३४५०mAh ची बॅटरी दिली गेली आहे. ह्याच्या त्वरित चार्ज करण्याच्या वैशिष्ट्यासाठी सपोर्टसुद्धा उपलब्ध आहे. ह्याच्या माध्यमातून केवळ १० मिनिटात आपण ७ तासांपर्यंत चालेल इतकी बॅटरी चार्ज करु शकतो. हा हँडसेट फॉर्स्ट व्हाईट, अॅल्युमिनियम आणि ग्रेफाइट रंगात उपलब्ध होईल.