हुआवेने लाँच केला हुआवे G7 प्लस स्मार्टफोन

हुआवेने लाँच केला हुआवे G7 प्लस स्मार्टफोन
HIGHLIGHTS

१३ मेगापिक्सेलच्या उत्कृष्ट कॅमे-यासहित हुआवेने बाजारात आपला नवीन स्मार्टफोन हुआवे G7 प्लस लाँच केला आहे. ह्या स्मार्टफोनची किंमत जवळपास २१,८०० रुपयांपर्यंत असू शकते.

पुन्हा एकदा मध्यम श्रेणीतील स्मार्टफोनच्या श्रेणीमध्ये हुआवेने आपला एक नवीन स्मार्टफोन लाँच केला आहे. चीनमध्ये कंपनीने आपला नवीन स्मार्टफोन G7 प्लस लाँच केला आहे. हा स्मार्टफोन G8 सारखाच आहे.

 

ह्या स्मार्टफोनच्या डिझाईनविषयी बोलायचे झाले तर. ह्यात मेटल-क्लेड डिझाईन दिले गेले आहे, ज्यामुळे हा स्मार्टफोनसारखा दिसतो. त्याचबरोबर ह्याचे स्पीकर ग्रिल्ससुद्धा जवळपास सारखेच आहेत. हा स्मार्टफोन हुआवेच्या G7 च्या पुढील पिढीचा नवीन स्मार्टफोन आहे. ज्याला बाजारात उच्च रिझोल्युशनसह आणले आहे.

ह्या स्मार्टफोनच्या वैशिष्ट्यांविषयी बोलायचे झाले तर, ह्या स्मार्टफोनमध्ये 5.5 इंचाची IPS पुर्ण एचडी डिस्प्ले दिली गेली आहे. त्याशिवाय हा स्मार्टफोन 1.2GHz क्वाड-कोर + 1.5GHz क्वाडकोर, ऑक्टा-कोर, क्वालकॉम MSM8639प्रोसेसरसह बाजारात आणला आहे. त्याशिवाय स्मार्टफोनमध्ये 3GB रॅमसह ३२जीबीचे अंतर्गत स्टोरेज दिले गेले आहे. ज्याला मायक्रो-एसडी कार्डच्या साहाय्याने १२८जीबीपर्यंत वाढवले जाऊ शकते. त्याचबरोबर ह्या स्मार्टफोनमध्ये फिंगरप्रिंट सेंसरसुद्धा दिला गेला आहे.

 

फोटोग्राफीसाठी स्मार्टफोनमध्ये १३ मेगापिक्सेलचा रियर कॅमेरा ऑटोफोकससह आणि ड्यूल टोन फ्लॅशसुद्धा ह्या कॅमे-यासह मिळत आहे. फोनमध्ये ५ मेगापिक्सेलचा फ्रंट फेसिंग कॅमेरासुद्धा दिला गेला आहे. त्याशिवाय ह्यात 3000mAh  क्षमतेची बॅटरी दिली गेली आहे. ड्यूल सिम सपोर्ट करणारा हा स्मार्टफोन 4G LTE, 3G, वायफाय आणि इतर स्टँडर्ड कनेक्टिव्हीटी पर्यायसह सुसज्ज आहे. त्याशिवाय हा स्मार्टफोन अॅनड्रॉईड 5.1 लॉलीपॉपसह इमोशन UI 3.1 वर चालतो. त्याचबरोबर ह्याची किंमत 330  डॉलर(जवळपास २१,८०० रुपये) आहे. मात्र कंपनीने आता ह्याच्या उपलब्धतेबाबत कोणतीही माहिती दिलेली नाही.

Digit NewsDesk

Digit NewsDesk

Digit News Desk writes news stories across a range of topics. Getting you news updates on the latest in the world of tech. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo