HTC वन M9 प्लस कॅमेरा एडिशन लाँच, ह्यात आहे उत्कृष्ट कॅमेरा फिचर्स

Updated on 30-May-2016
HIGHLIGHTS

HTC ने आपला नवीन स्मार्टफोन HTC वन M9+ प्राईम कॅमेरा एडिशन लाँच केला आहे. ह्या स्मार्टफोनमध्ये मिडियाटेक हेलिओ X10 प्रोसेसर आणि 5.2 इंचाची डिस्प्ले मिळत आहे.

HTC ने आपला आकर्षक कॅमेरा स्मार्टफोन वन M9 प्राइम कॅमेरा एडिशन लाँच केल्यानंतर काही दिवसांतच ह्याचा नवीन एडिशन लाँच केला आहे. हा स्मार्टफोन HTC वन M9+ प्राईम कॅमेरा एडिशन आहे. ह्या स्मार्टफोनला आपण HTC इंडियाच्या ई-स्टोरवर पाहू शकता.
 

ह्या स्मार्टफोनमध्ये मिडियाटेक हेलिओ X10 प्रोसेसर आणि 5.2 इंचाची FHD डिस्प्ले दिली आहे. त्याचबरोबर ह्यात 2GB ची रॅम आणि 16GBचे अंतर्गत स्टोरेज दिले आहे. स्मार्टफोनमध्ये 2840mAh क्षमतेची बॅटरी दिली गेली आहे.

ह्या स्मार्टफोनमध्ये 13MP चा रियर कॅमेरा आणि एक HTC अल्ट्रापिक्सेल फ्रंट कॅमेरा दिला गेला आहे. ह्यात एक फ्रंट फिंगरप्रिंट सेंसरसुद्धा दिले गेले आहे.

https://twitter.com/MAHESHTELECOM/status/736099546296549377

ह्या स्मार्टफोनची किंमत २३,९९० रुपये आहे. मात्र अजून हा अधिकृतरित्या विक्रीसाठी उपलब्ध झालेला नाही. हा एक थर्ड पार्टी रिटेलरच्या माध्यमातून खरेदी केला जाऊ शकतो.

 

हेदेखील वाचा – आसूस झेनपॅड 8, झेनपॅड 10 टॅबलेट लाँच, अॅनड्रॉईड मार्शमॅलोने सुसज्ज
हेदेखील वाचा – मोटोरोलाचा सर्वाधिक लोकप्रिय असलेला फोन मोटो रेजरची रिएन्ट्री

Disclaimer: Digit, like all other media houses, gives you links to online stores which contain embedded affiliate information, which allows us to get a tiny percentage of your purchase back from the online store. We urge all our readers to use our Buy button links to make their purchases as a way of supporting our work. If you are a user who already does this, thank you for supporting and keeping unbiased technology journalism alive in India.
Poonam Rane Poyrekar

Content Writer - Marathi

Connect On :