तुम्हाला माहिती आहे का? तुमच्या फोनचे सिम रिचार्ज न करताही तुम्ही मनसोक्त कॉलिंगचा लाभ घेऊ शकता. होय, आपणा सर्वांनाच माहिती असेल की, आपल्या फोनमध्ये Wi-Fi कॉलिंग नावाची सुविधा उपलब्ध असते. हे फिचर तुम्हाला Wi-Fi कनेक्शनवर आधारित कॉल करण्यास अनुमती देते. सर्व नवीनतम स्मार्टफोन्स आता या फीचर्ससह येतात. अशा परिस्थितीत, तुमच्या फोन नंबरवर रिचार्ज नसेल तरीही तुम्ही या फीचरद्वारे कोणालाही कॉल करू शकता.
लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे Wi-Fi कॉलिंगचा लाभ घेण्यासाठी तुमच्याकडे चांगले Wi-Fi कनेक्शन असणे आवश्यक आहे. Wi-Fi नेटवर्कमध्ये थोडी देखील समस्या आली तर, तुमचे कॉल सहज डिस्कनेक्ट होईल. या फोनमध्ये Wi-Fi कॉलिंग सुविधा कशी सक्षम कराल, ते बघुयात-
आम्ही तुम्हाला Android आणि iPhone या दोन्ही फोनवर Wi-Fi कॉलिंग कशी सक्रिय करता येईल. याची स्टेप बाय स्टेप सोपी प्रक्रिया सांगणार आहोत:
Android फोनमध्ये Wi-Fi Calling कशी सुरु कराल?
सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या स्मार्टफोनच्या Settings मध्ये जावे लागेल.
यानंतर नेटवर्क आणि इंटरनेट या ऑप्शनवर क्लिक करा.
येथे तुम्हाला सिम कार्ड आणि मोबाईल नेटवर्कवर जावे लागेल.
यानंतर स्क्रीनवर तुम्हाला तुमच्या फोनमध्ये असलेले सिम दिसतील.
तुम्ही ज्या सिमवरून कॉल करत आहात, त्यावर टॅप करा.
आता येथे तुम्हाला खाली स्क्रोल करून Wi-Fi कॉलिंगचा ऑप्शन दिसेल.
यानंतर तुम्हाला Wi-Fi कॉलिंग ऑप्शनचे टॉगल ऑन करावे लागेल.
अशाप्रकारे, Android युजर्स आपल्या मित्रांना, कुटुंबाला Wi-Fi कनेक्शनद्वारे सहज कॉल करण्यास सक्षम असाल.
iPhone मध्ये Wi-Fi कॉलिंग कशी सुरु कराल?
iPhone मध्ये Wi-Fi कॉलिंगसाठी, तुम्हाला प्रथम Settings मध्ये जावे लागेल.
यानंतर फोनवर जा. येथे तुम्हाला Wi-Fi कॉलिंगचा पर्याय मिळेल.
Wi-Fi कॉलिंगचे टॉगल ऑन करून, तुम्ही Wi-Fi कनेक्शनवरून कॉल करण्यास सक्षम असाल.
अशाप्रकारे, iPhone युजर्स आपल्या मित्रांना, कुटुंबाला Wi-Fi कनेक्शनद्वारे फोनमध्ये रिचार्ज नसतानाही सहज कॉल करू शकतात.
Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile