4GB रॅमने सुसज्ज असलेला ऑनर V8 स्मार्टफोन लाँच

4GB रॅमने सुसज्ज असलेला ऑनर V8 स्मार्टफोन लाँच
HIGHLIGHTS

ह्या स्मार्टफोनमध्ये दोन १२ मेगापिक्सेलचे रियर कॅमेरे दिले गेले आहे. हे रियर कॅमेरे ड्यूल LED फ्लॅश, लेजर ऑटोफोकस, BSI सेंसर आणि f/2.2 अॅपर्चरने सुसज्ज आहे.

हुआवेने बाजारात आपला नवीन स्मार्टफोन ऑनर V8 लाँच केला आहे. सध्यातरी ह्या स्मार्टफोनला केवळ चीनमध्ये लाँच केले गेेले आहे. ह्या स्मार्टफोनला फ्लॅश सेलच्या माध्यमातून खरेदी केले जाईल आणि ह्याची पहिली फ्लॅशसेल १७ मे पासून सुरु होईल. कंपनीने चीनमध्ये ह्या स्मार्टफोनचे तीन व्हर्जन लाँच केले आहे. ह्याच्या 4GB रॅम आणि 32GB अंतर्गत स्टोरेज व्हर्जनची किंमत CNY 2,299 (जवळपास २३,५०० रुपये) आहे आणि 4GB रॅम आणि 32GB अंतर्गत स्टोरेज (अतिरिक्त नेटवर्क सपोर्टसह) ची किंमत CNY 2,499 (जवळपास २५,५०० रुपये) आहे. ह्याच्या तिस-या 4GB रॅम आणि 64GB चे अंतर्गत स्टोरेज QHD डिस्प्ले दिली गेली आहे, ह्याची किंमत CNY 2,799(जवळपास २८,६००  रुपये) आहे. तथापि, आतापर्यंत कंपनीने ह्या दुस-या देशांमध्ये कधी लाँच होणार ह्याविषयी कोणतीही माहिती दिलेली नाही.
 

हॉनर V8 स्मार्टफोनच्या वैशिष्ट्यांविषयी बोलायचे झाले तर, ह्यात एक ड्यूल कॅमेरा सेटअप दिला गेला आहे, जी ह्या फोनची खास गोष्ट आहे. ह्या स्मार्टफोनमध्ये 12 मेगापिक्सेलचा रियर कॅमेरा दिला गेला आहे. तसेच रियर कॅमेरे ड्यूल LED फ्लॅश, लेझर ऑटोफोकस, BSI सेंसर, आणि f/2.2 अॅपर्चरने सुसज्ज आहे. त्याशिवाय ह्या स्मार्टफोनमध्ये 8 मेगापिक्सेलचा फ्रंट फेसिंग कॅमेरासुद्धा दिला आहे.
 

ह्या स्मार्टफोन दोन डिस्प्ले पर्यायासह लाँच केला गेला आहे. ह्यात 32GB चे अंतर्गत स्टोरेज व्हर्जनमध्ये 5.7 इंचाची पुर्ण HD डिस्प्ले दिली गेली आहे. ह्या डिस्प्लेचे रिझोल्युशन 1080×1920 पिक्सेल आहे आणि हा एक 386ppi डिस्प्ले आहे. ह्याच्या 64GB अंतर्गत स्टोरेजमध्ये 5.7 इंचाची क्वाड HD डिस्प्ले दिली आहे, ज्याचे रिझोल्युशन 1440×2560 पिक्सेल आहे आणि ही एक 515 ppi डिस्प्ले आहे.

हेदेखील पाहा – पेबल टाईम स्मार्टवॉच अनबॉक्सिंग 

हा स्मार्टफोन ऑक्टा-कोर किरिन 950 प्रोसेसर, माली T880 GPU आणि 4GB रॅमने सुसज्ज आहे. ह्या स्मार्टफोनच्या अंतर्गत स्टोरेजला मायक्रो-एसडी कार्डच्या साहाय्याने 128GB पर्यंत वाढवू शकतो. हा स्मार्टफोन अॅनड्रॉईड 6.0 मार्शमॅलोवर चालोत. ज्याच्यावर हुआवेचा EMUI 4.1 दिला गेला आहे. ह्या स्मार्टफोनमध्ये 3500mAh ची बॅटरी दिली गेली आहे. कनेक्टिव्हिटीसाठी ह्या स्मार्टफोनमध्ये 4G LTE, वायफाय, ब्लूटुथ 4.2, NFC, GPS/A-GPS, USB टाइप-C पोर्ट, 3.5mm हेडफोन जॅकसारखे फीचर्स दिले आहे. हा फोन प्लॅटिनम गोल्ड, रोज गोल्ड, शॅम्पेन गोल्ड आणि ग्लेशियर सिल्वर रंगात उपलब्ध होईल.

हेदेखील वाचा – १२ मे ला होणार LeEco Le 1S Eco स्मार्टफोनचा फ्लॅश सेल, किंमत ९,९९९ रुपये
हेदेखील वाचा – 
भारतात लाँच झाला मिजू M3 नोट, किंमत ९,९९९ रुपये

Digit NewsDesk

Digit NewsDesk

Digit News Desk writes news stories across a range of topics. Getting you news updates on the latest in the world of tech. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo