Honor Dasara Sale: Honor 9N, Honor 9 Lite आणि Honor 8 Pro वर मिळत आहे भरपूर डिस्काउंट

Updated on 05-Oct-2018
HIGHLIGHTS

Honor Dasara Sale 10 ऑक्टोबरला सुरू होऊन 15 ऑक्टोबर पर्यंत चालेल. या सेल मध्ये तुम्हाला Honor च्या अनेक स्मार्टफोन्स वर बेस्ट ऑफर्स आणि डिस्काउंट मिळणार आहे.

तुम्हाला तर माहित आहे की पुढल्या आठवड्यापासून भारतात सणासुदीचे दिवस सुरू होणार आहेत. ज्या प्रमाणे अनेक कंपन्या करत आहेत, त्याचप्रमाणे काहीसे Honor कडून पण समोर येत आहे. Honor त्यांच्या काही प्रोडक्ट्स/ स्मार्टफोन्स वर बेस्ट डिस्काउंट आणि ऑफर देत आहे. Honor Dasara Sale चे आयोजन 10 ऑक्टोबरला सुरू होऊन 15 ऑक्टोबर पर्यंत होणार आहे. या काळात कंपनी कडून तुम्हाला काही कूपन्स दिले जाणार आहेत, जे तुम्ही या सेल मध्ये वापरून बेस्ट ऑफर्स आणि डिस्काउंट इत्यादी मिळवू शकता. तुम्हाला या सेल मध्ये काही प्रोडक्ट्स फक्त Re 1 मध्ये मिळू शकतात. याव्यतिरिक्त लक्षात असू दे की Honor Big Week आणि Diwali Sale साठीचे पण बॅनर आधीच समोर आले आहेत. 

Honor Dasara Sale मध्ये तुम्हाला कंपनी कडून त्यांच्या वेबसाइट वरून प्रोडक्ट्स विकत घेण्यासाठी काही कूपन देण्यात येणार आहेत. यूजर्सनी जर Rs 20,000 ची खरेदी केली तर त्यांना Rs 1000 चे कूपन, Rs 10,000 च्या खरेदीवर Rs 500 आणि Rs 5000 च्या खरेदीवर तुम्हाला Rs 300 चे कूपन मिळेल. 

याव्यतिरिक्त तुम्हाला काही स्मार्टफोन्स वर पण बेस्ट ऑफर्स आणि डील्स मिळणार आहेत. जसे की जर आपल्याला Honor 7S बद्दल बोलायचे झाले तर यात तुम्हाला Rs 2,500 चा डिस्काउंट मिळणार आहे, हा डिवाइस तुम्हाला 11 ऑक्टोबर पासून Rs 6,499 मध्ये मिळेल. याव्यतिरिक्त तुम्हाला Rs 300 चा अतिरिक्त डिस्काउंट पण मिळेल. जर Honor 9N विषयी चर्चा केल्यास याच्या दोन्ही वेरिएंट्स वर तुम्हाला Rs 4,000 चा डिस्काउंट देण्यात येत आहे, याचा अर्थ असा की तुम्ही हा 11 ऑक्टोबर पासून Rs 11,999 आणि Rs 9,999 मध्ये घेऊ शकता. या सोबतच तुम्हाला Rs 500 चा अतिरिक्त डिस्काउंट पण देण्यात येईल. 

तसेच जर Honor 7A बद्दल बोलायचे झाले तर हा डिवाइस पण तुम्ही जवळपास Rs 3,000 च्या डिस्काउंट सह विकत घेऊ शकता. याचा अर्थ असा की तुम्ही हा फक्त Rs 7,999 मध्ये विकत घेऊ शकाल. तसेच या सोबत तुम्ही कूपन वापरल्यास तुम्हाला जवळपास Rs 300 चा अतिरिक्त डिस्काउंट पण मिळणार आहे. Honor 9 Lite पाहता या सोबत तुम्हाला Rs 4,000 चा डिस्काउंट मिळत आहे, याचा अर्थ असा की तुम्ही हा फक्त Rs 9,999 मध्ये विकत घेऊ शकता. त्याचबरोबर तुम्हाला Rs 300 चा डिस्काउंट कूपन वापरल्या नंतर मिळेल. या सेल मध्ये फक्त एवढेच डिवाइस नाहीत ज्यांच्यावर तुम्हाला डिस्काउंट आणि ऑफर्स मिळत आहेत. यात तुम्हाला इतर अनेक प्रोडक्ट्स आणि स्मार्टफोन्स मिळतील, जे तुम्हाला बेस्ट डिस्काउंट आणि ऑफर्स सह मिळतील. 
 

Disclaimer: Digit, like all other media houses, gives you links to online stores which contain embedded affiliate information, which allows us to get a tiny percentage of your purchase back from the online store. We urge all our readers to use our Buy button links to make their purchases as a way of supporting our work. If you are a user who already does this, thank you for supporting and keeping unbiased technology journalism alive in India.
Siddhesh Jadhav

Content Writer - Marathi

Connect On :