वायरलेस चार्जिंगसह Googleचा स्वस्त फोन लवकरच बाजारात होणार दाखल, मिळतील अप्रतिम फीचर्स

वायरलेस चार्जिंगसह Googleचा स्वस्त फोन लवकरच बाजारात होणार दाखल, मिळतील अप्रतिम फीचर्स
HIGHLIGHTS

Google Pixel 7a भारतात लवकरच लाँच होणार

Pixel 7a मध्ये 5W वायरलेस चार्जिंग मिळू शकते.

हा फोन Googleचा स्वस्त फोन असणार आहे.

Google Pixel 7 आणि Pixel 7 Pro नंतर, या सिरीजचे Google Pixel 7a परवडणारे मॉडेल भारतीय बाजारपेठेत लाँच केले जाईल. सध्याच्या Pixel 6a च्या तुलनेत याला अनेक अपग्रेड्स मिळणार आहेत आणि त्याची काही फीचर्स देखील समोर आली आहेत. कमी किंमत असूनही नवीन Pixel 7a अशी अनेक फीचर्स देईल, ज्यांची Pixel 6a मध्ये कमतरता आहे.

हे सुद्धा वाचा : Airtel vs Vi 199 rs Plan : कोणाचा प्लॅन ठरेल तुमच्यासाठी सर्वोत्तम, जाणून घ्या सर्व डिटेल्स…

Pixel 7a चे कोडनेम 'lynx' समोर आले आहे आणि त्याचा डिस्प्ले सध्याच्या परवडणाऱ्या Pixel मॉडेलपेक्षा उत्तम रिफ्रेश रेटसह येईल. म्हणजेच, या फोनला 90Hz रिफ्रेश रेटसह डिस्प्ले मिळेल. याशिवाय, Pixel 6a मध्ये वायरलेस चार्जिंग समर्थित नाही, जे Pixel 7a मध्ये मिळण्याची शक्यता आहे. मात्र, हे उघड झाले आहे की, Pixel 7a मध्ये 5W वायरलेस चार्जिंग मिळू शकते.

अपेक्षित फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स 

 एका अहवालानुसार, Pixel 7a हे 90Hz रिफ्रेश रेट आणि 5W वायरलेस चार्जिंगसह 1080p डिस्प्लेसह येणारे पहिले A-सीरीज डिव्हाइस असेल. त्याबरोबरच, कॅमेरा सेन्सर्सबद्दल बोलायचे झाले तर, सध्याच्या मॉडेलच्या तुलनेत यामध्ये वेगवेगळे कॅमेरा सेन्सर दिले जातील आणि उत्तम फोटोग्राफी परफॉर्मन्सही उपलब्ध होईल. नवीन डिव्हाइसमध्ये GN1, IMX787 आणि IMX712 सेन्सर असल्याचे समोर आले आहे.

नवीन डिव्‍हाइसमध्‍ये उत्तम डिस्‍प्‍ले आणि कॅमेरा परफॉर्मेंस मिळेल. मात्र, Pixel 6a प्रमाणे, Pixel 7a मध्ये देखील 3.5mm हेडफोन जॅक नसेल. 3.5 मिमी हेडफोन जॅक फिचर पिक्सेल A-सिरीजमधील शेवटचे डिव्हाइस Pixel 5a होते. कनेक्टिव्हिटीसाठी, यात USB टाइप-C पोर्ट देखील आढळू शकतो.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo