Google चा फ्लॅगशिप फोन Google Pixel 7 खरेदी करण्याची हीच योग्य वेळ आहे. हा फोन मागील वर्षी लाँच करण्यात आला होता. या फोन 59,999 रुपयांना लाँच करण्यात आला होता. सध्या Amazon या फोनवर प्रचंड सवलत देत आहे, असे समोर आले आहे. तुम्ही फोन खरेदी करण्यापूर्वी यावरील ऑफर्सबद्दल माहिती नक्की घ्यावी.
Survey
✅ Thank you for completing the survey!
Google Pixel 7 ची किमंत आणि ऑफर्स
Google Pixel 7 हा स्मार्टफोन Amazonवर केवळ 51,080 रुपयांना सूचिबद्ध आहे. या ऑफरसह ग्राहकांना 8,919 रुपयांचा थेट डिस्काउंट मिळतोय. ही डील Google Pixel 7 च्या 8GB+128GB मॉडेलवर मिळतेय. मात्र, ही ऑफर फक्त मर्यादित काळासाठीच उपलब्ध आहे. म्हणजेच या ऑफरचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला घाई करावी लागेल.
कंपनी कस्टमर्ससाठी फ्लॅट डिस्काउंट बेनिफिट देत आहे. Amazonवर ICICI क्रेडिट कार्डने व्यवहार केल्यास काही प्रमाणात बचत होईल. स्नो व्हाईट कलरमध्ये फोन उपलब्ध आहे. येथून खरेदी करा
फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स
Google Pixel 7 स्मार्टफोन 6.2 इंच लांबीच्या FHD+ डिस्प्लेसह येतो, ज्याचा रिफ्रेश रेट 120Hz आहे. यामध्ये सेल्फी कॅमेरासाठी पंच-होल कटआऊट देण्यात आला आहे. फ्लॅगशिप स्मार्टफोन कंपनीच्या Tensor G2 चिपसेट सपोर्टसह येतो. युजर्सना फोनमध्ये 8GB रॅम आणि 128GB स्टोरेज मिळेल.
फोटोग्राफीसाठी या फोनमध्ये ड्युअल रियर कॅमेरा सेटअप मिळेल. ज्यामध्ये 50MPचा मेन कॅमेरा आणि 12MP चा अल्ट्रा वाइड कॅमेरा दिला गेला आहे. आकर्षक सेल्फी आणि व्हीडिओ कॉलिंगसाठी 10.8MP चा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.
Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile