आज लाँच होऊ शकतात सॅमसंग गॅलेक्सी ऑन5 आणि गॅलेक्सी ऑन7

ने Digit NewsDesk | वर प्रकाशित 03 Nov 2015
HIGHLIGHTS
  • आज सॅमसंग दिल्लीमध्ये एक कार्यक्रम आयोजित करणार आहे आणि त्यासाठी माध्यमांना निमंत्रणही पाठवले आहे. त्यात सॅमसंग गॅलेक्सी ऑन5 आणि गॅलेक्सी ऑन7 लाँच होऊ शकतात अशी सर्वत्र चर्चा आहे.

आज लाँच होऊ शकतात सॅमसंग गॅलेक्सी ऑन5 आणि गॅलेक्सी ऑन7
आज लाँच होऊ शकतात सॅमसंग गॅलेक्सी ऑन5 आणि गॅलेक्सी ऑन7

मोबाईल निर्माता कंपनी सॅमसंग  आज आपले दोन स्मार्टफोन्स गॅलेक्सी ऑन5 आणि गॅलेक्सी ऑन7 लाँच करु शकतो. खरे पाहता आज सॅमसंग दिल्लीत एक कार्यक्रम आयोजित करत आहे आणि त्यासाठी माध्यमांना निमंत्रणही पाठवले आहे. त्याचबरोबर हल्लीच ह्या दोन्ही स्मार्टफोन्सना एका ऑनलाईन स्टोरवर लिस्ट केले होते.

 

काही दिवसांपूर्वी सॅमसंगच्या भारतीय वेबसाइटवर चुकून गॅलेक्सी ऑन5 आणि गॅलेक्सी ऑन7 स्मार्टफोन लिस्ट झाले होते. परंतू कंपनीद्वारा तात्काळ त्यांना तिथून हटविण्यात आले होते.  त्यानंतर लवकरच गॅलेक्सी ऑन5 आणि गॅलेक्सी ऑन7 ला कंपनीने चीनी वेबसाइटवर लिस्ट केले होते.

सॅमसंग गॅलेक्सी ऑन7 स्मार्टफोनच्या वैशिष्ट्यांविषयी बोलायचे झाले तर, ह्याला कंपनीच्या सपोर्ट साइटवर लिस्ट केले आहे. मात्र ह्या लिस्टिंगमध्ये ह्याची किंमत आणि त्याची उपलब्धता ह्याबाबत कोणतीच माहिती दिलेली नाही. जर गॅलेक्सी ऑन 5 आणि गॅलेक्सी ऑन7 च्या वैशिष्ट्यांविषयी बोलायचे झाले तर, ह्याचे जास्तकरुन सर्व फीचर्स सारखेच आहे. दोघांमध्ये फक्त एकच फरक आहे तो म्हणजे ह्याच्या स्क्रीनचा आकार. गॅलेक्सी ऑन5 मध्ये ५ इंचाचा डिस्प्ले आहे, तर गॅलेक्सी ऑन 7 मध्ये ५.५ इंचाचा डिस्प्ले आहे. दोन्हीही हँडसेट HD रिझोल्युशन (720x1280 पिक्सेल) TFT टचस्क्रीनसह येतील. ह्यात 1.2GHz क्वाड-कोर एक्सनोस ३४७५ प्रोसेसरसह १.५ जीबीचा रॅम असेल.

ह्या दोन्ही स्मार्टफोनमध्ये इनबिल्ट स्टोरेज 8GB आहे आणि ह्यात मायक्रो-एसडी कार्ड (१२८जीबी पर्यंत) साठी सपोर्ट आहे. गॅलेक्सी ऑन5 आणि गॅलेक्सी ऑन7 मध्ये अॅनड्रॉईडचा कोणता व्हर्जन असेल याबाबत अजून निश्चित माहिती मिळालेली नाही. गॅलेक्सी ऑन 7 मध्ये १३ मेगापिक्सेलचा रियर ऑटोफोकस कॅमेरा आहे आणि ५ मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरासुद्धा आहे. रियर कॅमे-यासोबत LED फ्लॅश दिला गेला आहे. आणि ह्याने आपण पुर्ण HD (1080पिक्सेल) रिझोल्युशनमध्ये व्हिडियो रेकॉर्ड करु शकाल.

तर गॅलेक्सी ऑन 5 मध्ये ८ मेगापिक्सेल रियर कॅमेरा आणि ५ मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा दिला आहे. आणि ह्याला आपण पुर्ण HD (१०८० पिक्सेल) रिझोल्युशनचे व्हिडियो रेकॉर्ड करु शकाल.  हा स्मार्टफोन 4G LTE ला सपोर्ट करतो. ह्यात एक्सेलेरोमीटर आणि प्रॉक्सिमिटी सेंसर दिले गेले आहे. गॅलेक्सी ऑन 5 2600mAh बॅटरीने सुसज्ज आहे. कनेक्टिव्हिटीसाठी ह्या स्मार्टफोनमध्ये ब्लूटुथ, GPS, ग्लोनास, मायक्रो-USB, 3G, GPRS/एज आणि वायफाय ८०२.११ B/G/N फीचर आहे. हा हँडसेट ब्लॅक आणि गोल्ड रंगात उपलब्ध होईल.

Digit NewsDesk
Digit NewsDesk

Email Email Digit NewsDesk

Follow Us Facebook Logo Facebook Logo Facebook Logo

About Me: Digit News Desk writes news stories across a range of topics. Getting you news updates on the latest in the world of tech. Read More

Tags:
Samsung galaxy on5 Samsung galaxy on7 सैमसंग गैलेक्सी ऑन5 गैलेक्सी ऑन7
Advertisements

ट्रेंडिंग लेख

Advertisements

LATEST ARTICLES सर्व पहा

Advertisements
Apple iPhone 12 (64GB) - White
Apple iPhone 12 (64GB) - White
₹ 46999 | $hotDeals->merchant_name
OnePlus 10 Pro 5G (Volcanic Black, 8GB RAM, 128GB Storage)
OnePlus 10 Pro 5G (Volcanic Black, 8GB RAM, 128GB Storage)
₹ 61999 | $hotDeals->merchant_name
realme narzo 50A Prime (Flash Blue, 4GB RAM+64GB Storage) FHD+ Display | 50MP AI Triple Camera (No Charger Variant)
realme narzo 50A Prime (Flash Blue, 4GB RAM+64GB Storage) FHD+ Display | 50MP AI Triple Camera (No Charger Variant)
₹ 11499 | $hotDeals->merchant_name
Redmi Note 10T 5G (Metallic Blue, 4GB RAM, 64GB Storage) | Dual 5G | 90Hz Adaptive Refresh Rate | MediaTek Dimensity 700 7nm Processor | 22.5W Charger Included
Redmi Note 10T 5G (Metallic Blue, 4GB RAM, 64GB Storage) | Dual 5G | 90Hz Adaptive Refresh Rate | MediaTek Dimensity 700 7nm Processor | 22.5W Charger Included
₹ 14999 | $hotDeals->merchant_name
Apple iPhone 13 (128GB) - Starlight
Apple iPhone 13 (128GB) - Starlight
₹ 64900 | $hotDeals->merchant_name