प्रसिद्ध इ कॉमर्स साईट Flipkart ने वर्षातील सर्वात मोठी सेल Flipkart Big Billion Days Sale 2024 ची घोषणा केली आहे. दरम्यान, या सेलच्या तारखा देखील जाहीर केले गेले आहेत. या सेलमध्ये तुम्ही स्मार्टफोन, TV, टॅबलेट आणि लॅपटॉप यासारख्या प्रीमियम वस्तू स्वस्त दरात खरेदी करण्यास सक्षम असाल. या सेलमध्ये प्रोडक्ट डिस्काउंट व्यतिरिक्त बँक कार्ड डिस्काउंट ऑफर देखील दिली जाणार आहे. एवढेच नाही तर, तुम्हाला कॅशबॅक आणि EMI डीलचा लाभ देखील मिळेल.
Flipkart Big Billion Days Sale 2024 ची तारीख जाहीर
वर सांगितल्याप्रमाणे, Flipkart Big Billion Days Sale 2024 ची तारीख जाहीर झाली आहे. त्यानुसार, हा सेल 27 सप्टेंबरपासून सर्व वापरकर्त्यांसाठी सुरू केला जाईल. मात्र, नेहमीप्रमाणे Flipkart Plus सदस्यांसाठी हा सेल 1 दिवस आधी म्हणजेच 26 सप्टेंबरपासून सुरु होणार आहे.
सेलदरम्यान मिळतील ऑफर्स
या सेल दरम्यान, ग्राहकांना प्रोडक्ट डिस्काउंट तसेच बँक कार्ड सवलतीचा लाभ मिळणार आहे. या सेलसाठी ई-कॉमर्स कंपनी Flipkart ने HDFC बँकसह पार्टनरशिप केली आहे. अशा परिस्थितीत, HDFC बँकेच्या कार्ड युजर्सना सेलदरम्यान 10% पर्यंत झटपट सूट मिळेल. याव्यतिरिक्त, सुपर मनी ॲपद्वारे UPI पेमेंट केल्यास ग्राहकांना कॅशबॅक ऑफर देखील मिळेल.
स्मार्टफोन्सवर आकर्षक डील्स उपलब्ध
Flipkart Big Billion Days Sale 2024 दरम्यान तुम्हाला स्मार्टफोन्सवर आकर्षक डील्सचा लाभ घेता येईल. सेलदरम्यान iPhone, Samsung, Motorola, Vivo, Realme, Poco, Nothing, OPPO, Google आणि Infinix ब्रँड्सच्या स्मार्टफोन्सवर उत्तम डील मिळणार आहेत. येत्या काही दिवसांत कंपनी हळूहळू सर्व डील्सचे अनावरण करेल, अशी अपेक्षा आहे. महत्त्वाचे लक्षात घ्या की, सेल दरम्यान तुम्ही iPhones स्वस्त किमतीत खरेदी करण्यास सक्षम असाल. याशिवाय, कंपनी Google Pixel स्मार्टफोन्सवरही उत्तम डील प्रदान केली जाईल.
Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile