Coca-Cola घेऊन येत आहे नवीन स्मार्टफोन, तुम्ही पण बघा अनोखी डिझाईन

Coca-Cola घेऊन येत आहे नवीन स्मार्टफोन, तुम्ही पण बघा अनोखी डिझाईन
HIGHLIGHTS

Coca-Cola या नवीन फोनसाठी एका स्मार्टफोन ब्रँडसोबत सहयोग करत आहे.

Coca-Cola प्रमाणेच, फोनमध्ये सर्वत्र लाल रंग आहे.

मुकुलने शेअर केलेले डिझाइन अलीकडेच लाँच केलेल्या Realme 10 4G सह जुळते.

Cola फोनबद्दल काही काळापासून अफवा पसरत आहेत. आता, सुप्रसिद्ध लीकस्टर मुकुल शर्मा यांनी फोनचे उच्च-रिझोल्यूशन रेंडर शेअर केले आहे, जे फोनचे मागील डिझाइन दर्शवते. याशिवाय, मुकुलने शेअर केले आहे की, कोला फोन भारतात या तिमाहीत लाँच होईल आणि Coca-Cola या नवीन फोनसाठी एका स्मार्टफोन ब्रँडसोबत सहयोग करत आहे.

हे सुद्धा वाचा : Infinix चा नवीन बजेट स्मार्टफोन लाँच, जाणून घ्या किंमत आणि जबरदस्त फीचर्स… 

मुकुलने ब्रँडचे नाव स्पष्टपणे नमूद केलेले नसले तरी, हा ब्रँड Realme असू शकतो अशी अटकळ पसरवली जात आहे. मुकुलने शेअर केलेले डिझाइन नुकत्याच लाँच केलेल्या Realme 10 4G शी जुळते, पण ते निश्चितपणे सांगता येत नाही. कोला फोनच्या मागील बाजूस LED फ्लॅशसह ड्युअल कॅमेरा सेन्सर आहे. व्हॉल्यूम रॉकर उजव्या काठावर आहे आणि राउंड एजेस आहेत. कोको-कोला प्रमाणेच, फोनमध्ये सर्वत्र लाल रंग दिसोतय. याक्षणी कोला फोनबद्दल इतर कोणतीही माहिती सामायिक केलेली नाही.

 

 

Realme 10 4G चे स्पेक्स 

  Realme 10 4G फोन 5,000mAh बॅटरीसह लाँच केला गेला आहे, जो 33W SuperVOOC फास्ट चार्जिंग सपोर्ट देते. यामध्ये 2MP B&W पोर्ट्रेट कॅमेरासह मागील बाजूस 50MP प्राथमिक कॅमेरा आहे. तर, सेल्फी आणि व्हिडिओ कॉलसाठी फोनच्या फ्रंट पॅनलवर 16MP सेंसर उपलब्ध आहे.

स्मार्टफोनच्या फ्रंट पॅनलमध्ये 6.5-इंच लांबीचा FHD+ AMOLED डिस्प्ले आहे, जो 90Hz रिफ्रेश रेट ऑफर करतो. या डिस्प्लेवर सेल्फी कॅमेरासाठी पंच-होल कटआउट देण्यात आला आहे. Realme 10 4G मध्ये MediaTek Helio G99 प्रोसेसर 8GB LPDDR4X RAM आणि 128GB UFS 2.2 स्टोरेजसह पेयर आहे.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo