आगामी Affordable स्मार्टफोन CMF Phone 1 ‘या’ दिवशी होणार लाँच, कंपनीने केले कन्फर्म, बघा टिझर Video!
CMF भारतात लवकरच आपला पहिला फोन CMF Phone 1 लाँच करेल.
ब्रँडने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X आणि Flipkart वर नवीन टीझर जारी केला.
CMF Phone 1 ची किंमत 20 हजार रुपयांच्या अंतर्गत असू शकते.
Nothing चे सब-ब्रँड CMF भारतात लवकरच आपला पहिला फोन CMF Phone 1 लाँच करणार आहे. मागील काही काळात या संदर्भात अनेक अपडेट्स ब्रँडकडून देण्यात आले आहेत. आता कंपनीने CMF Phone 1 लाँचची तारीख जाहीर केली आहे. हा डिवाइस 8 जुलै रोजी भारतीय बाजारपेठेत लाँच केला जाईल. CMF Watch Pro 2 आणि CMF Buds Pro 2 सारखे गॅझेट देखील यासोबत येतील.
SurveyAlso Read: OnePlus Nord CE4 Lite 5G ची नवी भारतीय लाँच डेट जाहीर, अगदी बजेटमध्ये मिळणार स्टायलिश डिझाईन
आगामी CMF Phone 1 बद्दल अनेक लीक्स आतापर्यंत पुढे आले आहेत. विशेष बाब म्हणजे नवीन स्मार्टफोन कमी किंमतीत दमदार फीचर्ससह अनोख्या शैलीत येण्याची अपेक्षा आहे. चला तर मग नवीन टीझर व्हिडिओ आणि इतर संभाव्य माहिती बघुयात-
CMF Phone 1 लॉन्चिंग डिटेल्स
ब्रँडने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X आणि ई-कॉमर्स साइट Flipkart वर एक नवीन टीझर जारी केला आहे. तुम्ही खाली दिलेल्या पोस्टमध्ये पाहू शकता की, कंपनीने CMF फोन 1 सोबत Watch Pro 2 आणि CMF Buds Pro 2 च्या लाँचबाबत देखील पुष्टी केली आहे.
A wonderful turn of events.
— CMF by Nothing (@cmfbynothing) June 18, 2024
Buds Pro 2 and Watch Pro 2 join Phone 1 in the new CMF by Nothing line-up.
Learn everything at our next Community Update on 8 July 2024, 10:00 BST. pic.twitter.com/we04dldkBa
ही सर्व उपकरणे 8 जुलै रोजी ब्रिटिश वेळेनुसार 10:00 वाजता लाँच केली जातील. तर, भारतात हा कार्यक्रम दुपारी 2:30 वाजता पाहता येईल. टीझर Video मध्ये ब्रँडने फोन आणि इतर डिवाइस दाखवली आहेत ज्यात तीन गोलाकार रिंग आहेत. हा स्मार्टफोन ऑरेंज आणि ब्लॅक कलरमध्ये सादर केला जाईल.
CMF Phone 1 चे लीक तपशील
वर सांगितल्याप्रमाणे CMF Phone 1 चे अनेक तपशील लीक झाले आहेत. लीकनुसार, CMF Phone 1 च्या बेस मॉडेल 6GB RAM + 128GB स्टोरेजची किंमत 19,999 रुपये असू शकते. ही किंमत बॉक्सवर येऊ शकते परंतु ऑफरसह मोबाइल सुमारे 17,000 रुपयांमध्ये खरेदीसाठी उपलब्ध होण्याची शक्यता आहे.

CMF फोन 1 मध्ये 6.67-इंच लांबीचा FHD+ OLED डिस्प्ले असू शकतो, ज्याचा रिफ्रेश रेट 120Hz चा आहे. स्पीड आणि मल्टीटास्किंगसाठी, फोनमधेय MediaTek Dimensity 7300 octacore प्रोसेसर मिळू शकतो. फोटोग्राफीसाठी, फोनमध्ये ड्युअल रियर कॅमेरा अपेक्षित आहे. फोनच्या मागील पॅनलवर 50MP ची प्रायमरी लेन्स आणि 16MP लेन्स फ्रंटल ठेवली जाऊ शकते. फोनमध्ये 5,000mAh मोठी बॅटरी 33W जलद चार्जिंगसह लाँच केली जाईल.
Reshma Zalke
Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile