HIGHLIGHTS
Vivo X90 सिरीज भारतात दाखल
SBI क्रेडिट कार्डने पेमेंट केल्यास 10% इन्स्टंट सूट
ICICI क्रेडिट कार्डने पेमेंट व्यवहार केल्यास 3,500 रुपयांची सूट
नुकतेच Vivo X90 सिरीज भारतात दाखल झाली आहे. ही सिरीज लाँच होताच Vivo X80 ची किंमत कमी करण्यात आली आहे. हा फोन फ्लिपकार्टवरील सर्व डिस्काउंट ऑफरसह 28,749 रुपयांना खरेदी करता येईल. जर तुम्ही हा फोन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर ही ऑफर नक्की वाचा.
Surveyआता तुमचे महागडे फोन खरेदी करण्याचे स्वप्न पूर्ण होऊ शकते. या फोनच्या 8GB रॅम आणि 128GB स्टोरेज वेरिएंटची किंमत 59,999 रुपये आहे. मात्र, डिस्कॉउंटसह हा फोन 54,999 रुपयांना सूचिबद्ध आहे. तसेच, त्याच्या 12GB रॅम आणि 256GB स्टोरेज वेरिएंटची किंमत 64,999 रुपये आहे. मात्र, हा फोन डिस्काउंटसह 61,799 रुपयांना सूचिबद्ध आहे.
यासोबत, EMI पर्याय देखील मिळतोय. जर तुम्ही ते नो कॉस्ट EMI वर खरेदी केले, तर तुम्हाला दरमहा 6,111 रुपये द्यावे लागतील. तसेच, स्टॅंडर्ड EMI वर फोन खरेदी करण्यासाठी दर महिन्याला किमान 1,880 रुपये भरावे लागतील.
Vivo X80 वर बरेच बँक ऑफर्स उपलब्ध आहेत. SBI क्रेडिट कार्डने पेमेंट केल्यास 10% इन्स्टंट सूट दिली जाईल. HDFC क्रेडिट कार्डने पेमेंट केल्यास 3,500 रुपयांची सूट दिली जाणार आहे. तसेच, ICICI क्रेडिट कार्डने पेमेंट व्यवहार केल्यास 3,500 रुपयांची सूट मिळणार आहे.
एक्सचेंज ऑफरद्वारे फोन खरेदी करण्याची इच्छा असल्यास एक जबरदस्त ऑफर मिळेल. एक्सचेंजसह तुम्हाला 26,250 रुपयांपर्यंत सूट मिळेल. पूर्ण एक्सचेंज व्हॅल्यू मिळाल्यावर, तुम्हाला हा फोन केवळ 28,749 रुपयांना मिळणार आहे. मात्र, लक्षात घ्या की तुमच्या जुन्या फोनची स्थिती उत्तम असायला हवी.
Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile