अलीकडेच कंपनीने Vivo V27 5G हा लेटेस्ट स्मार्टफोन लाँच केला आहे. त्यानंतर पहिल्यांदा हा फोन भारी सवलतींसह खरेदीसाठी उपलब्ध झाला आहे. जर तुम्ही Vivo चा हा नवीन स्मार्टफोन घेण्याचा विचार करत असाल, तर तुम्ही अगदी योग्य ठिकाणी आहात. या लेखात आम्ही तुम्हाला या स्मार्टफोनवरील ऑफर्सबद्दल सांगणार आहोत. हा फोन खरेदीसाठी Flipkart वर उपलब्ध आहे.
Survey
✅ Thank you for completing the survey!
Vivo V27 5G ची किमंत
Flipkart वर Vivo V27 5G ची MRP 36,999 रुपये आहे. मात्र साईटवर या फोनवर 10% सवलत मिळत आहे. त्यानंतर हा फोन 32,999 रुपयांना फ्लिपकार्टवर सूचिबद्ध करण्यात आला आहे. यासोबतच तुम्हाला यावर अनेक बँक ऑफर्सही मिळत आहेत.
Vivo V27 5G वर बँक ऑफर्समध्ये HDFC बँक क्रेडिट कार्ड EMI व्यवहारावर 1,250 रुपयांची सवलत आहे. मात्र,जर तुमच्याकडे HDFC बँकेचे क्रेडिट कार्ड नसेल तर काळजी करू नका. कारण आम्ही तुम्हाला आणखी एका ऑफरबद्दल सांगणार आहोत. तुम्हाला ICICI बँक क्रेडिट कार्ड आणि डेबिट कार्ड EMI व्यवहारावर थेट 10% सूट मिळणार आहे.
एक्सचेंज ऑफर
त्याबरोबरच, हा फोन तुम्हाला एक्सचेंज ऑफर अंतर्गत खूपच कमी किमतीत मिळेल. जर तुम्ही जुना किंवा विद्यमान स्मार्टफोन एक्सचेंज केला तर तब्बल 30 हजार रुपयांची सूट उपलब्ध आहे. मात्र, चांगली एक्सचेंज व्हॅल्यू मिळवण्यासाठी फोनची स्थिती उत्तम हवी.
Vivo V27 5G
या फोनमध्ये 6.78 इंच लांबीचा फुल HD+ AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे. त्याबरोबरच, यात Mediatek Dimensity 7200 5G प्रोसेसर उपलब्ध आहे. फोनमध्ये ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप 50MP प्रायमरी कॅमेरा आणि 50MP फ्रंट कॅमेरासह उपलब्ध आहे. बॅटरीबद्दल बोलायचे झाल्यास, फोनमध्ये 4600mAh बॅटरी उपलब्ध आहे.
Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile