TECNO Phantom V Flip 5G Discount: सर्वात स्वस्त फ्लिप फोन आणखी स्वस्तात खरेदी करा, तब्बल 11,000 रुपयांची सूट। Tech News 

HIGHLIGHTS

TECNO Phantom V Flip 5G स्मार्टफोन सर्वात स्वस्त फ्लिप फोन आहे.

या फोनच्या खरेदीवर तुम्ही तब्बल 11,000 रुपयांची बचत करू शकता.

आकर्षक सेल्फी आणि व्हीडिओ कॉलिंगसाठी तुम्हाला फोनमध्ये 32MP फ्रंट कॅमेरा मिळेल.

TECNO Phantom V Flip 5G Discount: सर्वात स्वस्त फ्लिप फोन आणखी स्वस्तात खरेदी करा, तब्बल 11,000 रुपयांची सूट। Tech News 

सध्या सर्वत्र फ्लिप आणि फोल्डेबल स्मार्टफोन्सचे क्रेझ तरुणाईमध्ये दिसून येत आहे. मात्र, हे स्मार्टफोन्स जरा महागड्या बजेट रेंजमध्ये येत असल्यामुळे खिशाचा विचार हा प्रत्येकाला करावाच लागतो. आम्ही तुम्हाला सांगतो की, TECNO Phantom V Flip 5G स्मार्टफोन या विभागात कमी किमतीचा स्मार्टफोन आहे. या फोनवर सध्या प्रचंड डिस्काउंट दिला जात आहे. त्यामुळे तुम्ही या फ्लिप फोनवर हजारोंची बचत करू शकता. बघुयात ऑफर-

Digit.in Survey
✅ Thank you for completing the survey!

हे सुद्धा वाचा: Honor X9b Price Leak: लाँचपूर्वी आगामी स्मार्टफोनची किंमत आणि कॅमेरा स्पेक्स लीक, लवकरच भारतात होणार लाँच। Tech News

TECNO Phantom V Flip 5G ची किंमत आणि ऑफर्स

TECNO Phantom V Flip 5G फोनचे 16GB रॅम आणि 256GB स्टोरेज मॉडेल Amazon वरून 54,999 रुपयांना खरेदी केले जाऊ शकतात. ऑफर्सबद्दल बोलायचे झाल्यास, Amazon या फोनवर 10,000 रुपयांचे डिस्काउंट कूपन देत आहे. यासोबतच, बँक कार्डद्वारे फोनवर 1000 रुपयांची वेगळी सूटदेखील उपलब्ध आहे. अशा प्रकारे, तुम्ही या फोनच्या खरेदीवर तब्बल 11,000 रुपयांची बचत करू शकता. यासह तुम्ही हा स्मार्टफोन फक्त 43,999 रुपयांमध्ये खरेदी करू शकता. Buy from here

TECNO PHANTOM V FLIP 5G

TECNO Phantom V Flip 5G चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स

TECNO Phantom V Flip 5G फोनमध्ये 6.9 इंच लांबीचा मेन फ्लेक्सिबल AMOLED डिस्प्ले आहे. यासोबत 1.32 इंच लांबीचा सेकंडरी कव्हर डिस्प्ले उपलब्ध आहे. हा फोन स्पीड आणि मल्टीटास्किंगसाठी MediaTek Dimensity 8050 प्रोसेसरने सुसज्ज आहे. या फोनमध्ये 8+8GB अशी 16GB RAM आणि 256GB स्टोरेज उपलब्ध आहे.

याव्यतिरिक्त, फोनमध्ये फोटोग्राफीसाठी TECNO Phantom V Flip 5G फोनमध्ये ड्युअल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. ज्यात तुम्हा 64MP रियर कॅमेरासह 13MP सेकंडरी कॅमेरा मिळणार आहे. या कॅमेरासह तुम्ही डिटेल्ड इमेज कॅप्चर करू शकता. तसेच, आकर्षक सेल्फी आणि व्हीडिओ कॉलिंगसाठी तुम्हाला फोनमध्ये 32MP फ्रंट कॅमेरा मिळणार आहे. बॅटरीबद्दल बोलायचे झाल्यास, 45W फास्ट चार्जिंग सपोर्टसह 4000mAh ची बॅटरी देण्यात आली आहे.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo