Samsung च्या लेटेस्ट Flip फोनवर मिळवा तब्बल 14,000 रुपयांचा बंपर Discount, अशी संधी पुन्हा मिळणार नाही। Tech News 

HIGHLIGHTS

लेटेस्ट Samsung Galaxy Z Flip 5 प्रचंड सवलतीसह खरेदी करण्याची संधी

Samsung Galaxy Z Flip 5 स्मार्टफोन Amazon वर आकर्षक ऑफर्ससह उपलब्ध

फोनमध्ये फोटोग्राफीसाठी ड्युअल रियर कॅमेरा सेटअप आहे.

Samsung च्या लेटेस्ट Flip फोनवर मिळवा तब्बल 14,000 रुपयांचा बंपर Discount, अशी संधी पुन्हा मिळणार नाही। Tech News 

सध्या टेक विश्वात प्रसिद्ध स्मार्टफोन निर्माता साऊथ कोरियाची कंपनी Samsung चे फोल्डेबल स्मार्टफोन्स बेस्ट मानmले जातात. कंपनी दर वर्षी आपले नवीन फोल्डेबल स्मार्टफोन्स नवनव्या फीचर्स आणि टेक्नॉलॉजीसह लाँच करत असते. मात्र, हे फोल्डेबल स्मार्टफोन्स मोठ्या प्रमाणात एक्सपेन्सिव्ह असतात, त्यामुळे ते खरेदी करण्यासाठी आधी चांगला बजेट असणे महत्त्वाचे आहे. पण, Samsung चा लेटेस्ट Samsung Galaxy Z Flip 5 खरेदी करण्यासाठी तुम्ही इ-कॉमर्स साईट Amazon ची मदत घेऊ शकता. Amazon वर हा फोन अप्रतिम ऑफर्ससह खरेदीसाठी उपलब्ध आहे.

Digit.in Survey
✅ Thank you for completing the survey!

हे सुद्धा वाचा: 50MP प्रायमरी कॅमेरासह लोकप्रिय OnePlus 11R स्मार्टफोन प्रचंड Discount सह खरेदी करा, बघा Best ऑफर्स

Samsung Galaxy Z Flip 5 ची किंमत आणि ऑफर्स

Samsung Galaxy Z Flip 5 फोनच्या 8GB रॅम आणि 256GB स्टोरेज मॉडेलची किंमत Amazon वर 96,999 रुपये इतकी सूचिबद्ध आहे. फोनवरील उपलब्ध ऑफर्सबद्दल बोलायचे झाल्यास, यावर HDFC बँकेच्या कार्डद्वारे तब्बल 14,000 रुपयांची डिस्काउंट ऑफर दिली जात आहे. त्याबरोबरच, यावर नो कॉस्ट EMI देखील उपलब्ध आहे. तर, EMI 4,703 रुपयांपासून सुरु होतो.

samsung galaxy z flip 5

एवढेच नाही तर, या फोनवर एक्सचेंज ऑफरसह 44,250 रुपयांची सूट देखील मिळेल. मात्र, तुमच्या जुन्या किंवा विद्यमान फोनच्या स्थितीवर एक्सचेंज व्हॅल्यू ठरेल. येथून खरेदी करा

Samsung Galaxy Z Flip 5 चे फीचर्स आणि स्पेक्स

Samsung Galaxy Z Flip 5 फोनमध्ये 6.7 इंच लांबीचा फुल-HD+ डिस्प्ले आहे. तर, फोनच्या मागील बाजूस 3.4 इंच लांबीचा सुपर AMOLED कव्हर डिस्प्ले आहे. उत्तम परफॉर्मन्ससाठी, हा फोन Snapdragon 8 Gen 2 प्रोसेसरने सुसज्ज आहे. स्टोरेज सेक्शनबद्दल बोलायचे झाल्यास, फोनमध्ये 8GB रॅम आणि 256GB स्टोरेज आणि 8GB रॅम आणि 512GB स्टोरेज देण्यात आली आहे.

Samsung Galaxy Z Flip 5 फोनमध्ये फोटोग्राफीसाठी ड्युअल रियर कॅमेरा सेटअप आहे. यात 12MP अल्ट्रा-वाइड प्रायमरी कॅमेरा आणि 12MP सेकंडरी कॅमेरा आहे. आकर्षक सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी फोनमध्ये 10MP फ्रंट कॅमेरा देखील देण्यात आला आहे. बॅटरीबद्दल बोलायचे झाल्यास, फोनमध्ये 3700mAh बॅटरी देण्यात आली आहे, ज्यामध्ये 25W फास्ट चार्जिंग सपोर्ट मिळेल.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo