साऊथ कोरियाची प्रसिद्ध स्मार्टफोन निर्माता Samsung ने मागील वर्षी आपला बेस्ट सेलिंग स्मार्टफोन Samsung Galaxy S23 FE भारतीय बाजारात लाँच केला. आता दिवाळीच्या विशेष मुहूर्तावर हा स्मार्टफोन कंपनीने मोठ्या सवलतीसह खरेदीसाठी उपलब्ध करून दिला आहे. होय, प्रसिद्ध इ-कॉमर्स साईट Flipkart वर दिवाळी स्पेशल सेलमध्ये Samsung Galaxy S23 FE वर ऑफर्सचा भारी वर्षाव सुरु आहे. विशेष म्हणजे या फोनवर तब्बल 50,000 रुपयांचा Discount मिळत आहे.
Samsung Galaxy S23 FE फोनच्या 8GB रॅम आणि 128GB स्टोरेज वेरिएंटची किंमत Flipkart वर 79,999 रुपये आहे. मात्र, वर सांगितल्याप्रमाणे Flipkart च्या माध्यमातून हा फोन स्वस्तात खरेदी करण्याची संधी आहे. दिवाळी स्पेशल सेलमध्ये Samsung Galaxy S23 FE फोन आता केवळ 29,999 रुपयांना सूचिबद्ध करण्यात आला आहे. होय, हा फोन आता तब्बल 50,000 रुपयांच्या सवलतीसह उपलब्ध आहे. फोनचा 8GB+ 128GB स्टोरेज व्हेरिएंट या किमतीत उपलब्ध आहे.
ऑफर्सबद्दल बोलायचे झाल्यास, Flipkart एक्सिस क्रेडिट बँक कार्डद्वारे पेमेंट केल्यास 5% कॅशबॅक मिळेल. यावर 5000 रुपये प्रतिमहासह नो कॉस्ट EMI ऑफर उपलब्ध आहे. त्याबरोबरच, जर तुमच्याकडे जुना किंवा विद्यमान फोन एक्सचेंजसाठी उपलब्ध असल्यास 18 हजार पर्यंत एक्सचेंज ऑफर देखील मिळेल. येथून खरेदी करा
Samsung Galaxy S23 FE चे फीचर्स आणि स्पेक्स
Samsung Galaxy S23 FE
Samsung Galaxy S23 FE फोनमध्ये 6.4 इंच लांबीचा फुल HD+ AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे. या डिस्प्लेचा रिफ्रेश रेट 120Hz इतका आहे. स्पीड आणि मल्टीटास्किंगसाठी, हा फोन Exynos 220 प्रोसेसरद्वारे सुसज्ज आहे. Samsung Galaxy S23 FE फोनमध्ये फोटोग्राफीसाठी ड्युअल रियर कॅमेरा सेटअप आहे, ज्यामध्ये 50MP प्राथमिक कॅमेरा प्रदान करण्यात आला आहे. सोबत 12MP सेकंडरी कॅमेरा देण्यात आला आहे. आकर्षक सेल्फी आणि व्हीडिओ कॉलिंगसाठी 10MP फ्रंट कॅमेरा मिळेल. पॉवर बॅकअपसाठी, फोनमध्ये यात 4500mAh बॅटरी आहे, यासह 25W फास्ट चार्जिंग देखील मिळेल.
डिस्क्लेमर: या स्टोरीमध्ये एफिलीएट लिंक्स उपलब्ध आहेत.
Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile