Redmi Note 12 प्रचंड सवलतीत उपलब्ध, ‘येथे’ मिळतेय भारी ऑफर

HIGHLIGHTS

Redmi Note 12 वर मिळतेय भारी सूट

4GB+128GB व्हेरिएंटची किंमत 17,999 रुपये

ICICI बँक क्रेडिट कार्ड 1,000 रुपयांची सूट

Redmi Note 12 प्रचंड सवलतीत उपलब्ध, ‘येथे’ मिळतेय भारी ऑफर

Amazon वर बरेच स्मार्टफोन्स उत्तम सवलतीसह खरेदीसाठी उपलब्ध आहेत. या यादीत Redmi Note 12 चे नाव देखील सामील आहे. तुम्हाला या फोनवर बरेच ऑफर्स मिळणार आहेत. यामध्ये, बँक ऑफर्स आणि इतर ऑफर्सचा देखील समावेश आहे. यासह हा फोन अगदी स्वस्तात खरेदी करता येणार आहे. 

Digit.in Survey
✅ Thank you for completing the survey!

Redmi Note 12 किंमत आणि ऑफर्स 

स्मार्टफोनच्या 4GB+128GB व्हेरिएंटची ऍमेझॉनवर किंमत 17,999 रुपये आहे. तर, टॉप वेरिएंट 21,999 रुपयांना सूचिबद्ध आहे. हा फोन जर तुम्ही ICICI च्या क्रेडिट कार्डने खरेदी केल्यास तुम्हाला पूर्ण एक हजार रुपयांचा इन्स्टंट डिस्काउंट मिळेल. येथून खरेदी करा

यावर नो कॉस्ट EMI पर्याय देखील मिळणार आहे. तसेच, जुन्या फोनची देवाण घेवाण करायची असल्यास यावर संपूर्ण 17,099 रुपयांची सूट मिळेल. मात्र, तुमचा जुना किंवा विद्यमान फोन उत्तम स्थितीत हवा. 

Redmi Note 12

या स्मार्टफोनमध्ये 6.67-इंच लांबीचा फुल HD+सुपर AMOLED डिस्प्ले आहे, ज्याचा रिफ्रेश रेट 120Hz आहे. फोनच्या बेस व्हेरिएंटमध्ये 4GB रॅम आणि 128GB स्टोरेज आहे. दुसऱ्या वेरिएंटमध्ये 6GB रॅमसह 128GB स्टोरेज देण्यात आले आहे. टॉप व्हेरिएंट 8GB रॅम आणि 256GB स्टोरेजसह येतो. 

या फोनमध्ये 5000mAh ची बॅटरी देण्यात आली आहे, जी 33W फास्ट चार्जिंग सपोर्टसह येईल. चार्जिंगसाठी USB टाइप-सी पोर्ट देण्यात आला आहे. फोटोग्राफीसाठी 48MP AI ट्रिपल कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. म्हणेजच, 48MP मुख्य कॅमेरा, 8MP अल्ट्रा वाइड कॅमेरा आणि 2MP मॅक्रो कॅमेरा आहे. फोनच्या फ्रंटमध्ये 13MP कॅमेरा देण्यात आला आहे.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo