प्रसिद्ध चीनी स्मार्टफोन निर्माता Realme चे स्मार्टफोन्स भारतात मोठ्या प्रमाणात वापरले जातात. कंपनीने मार्चमध्ये देशात Realme Narzo 70 Pro 5G लाँच केला होता. हा स्मार्टफोन विशेष आणि अनोखे फीचर्स तसेच आकर्षक लुकसह लाँच करण्यात आला. या स्मार्टफोनमध्ये प्रोसेसर म्हणून ऑक्टाकोर मीडियाटेक डायमेंसिटी 7050 देण्यात आला आहे. हा लेटेस्ट फोन सध्या मोठ्या सवलतीसह खरेदी करण्याची संधी आहे. जाणून घेऊयात Realme Narzo 70 Pro 5G वरील ऑफर्स-
Realme च्या Savings Day सेलमध्ये Narzo 70 Pro 5G वर 3,000 रुपयांपर्यंत सूट दिली जात आहे. मात्र, ही सवलत गुरुवार मध्यरात्रीपर्यंत केवळ 12 तासांसाठी उपलब्ध आहे. या स्मार्टफोनच्या 8GB + 128GB वेरिएंटची मूळ किंमत 19,999 रुपये आहे.
ऑफर्सबद्दल बोलायचे झाल्यास, या सेलमध्ये हा फोन 3,000 रुपयांच्या डिस्काउंटसह खरेदी केला जाऊ शकतो. तर, त्याच्या 8GB + 256GB व्हेरिएंटवर 2,000 रुपयांची सूट आहे. हा स्मार्टफोन ग्लास ग्रीन आणि ग्लास गोल्ड कलर ऑप्शन्समध्ये उपलब्ध आहे. ही सवलत Amazon वर उपलब्ध आहे.
Realme Narzo 70 Pro 5G
Realme Narzo 70 Pro 5G चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स
Realme Narzo 70 Pro 5G मध्ये 6.67 इंच लांबीचा फुल HD+ OLED स्क्रीन आहे. उत्तम परफॉर्मन्ससाठी यात ऑक्टाकोर मीडियाटेक डायमेन्सिटी 7050 प्रोसेसर उपलब्ध आहे. विशेष फीचर्सबद्दल बोलायचे झाल्यास, या फोनमध्ये एअर जेश्चर आणि रेनवॉटर टचसारखे अप्रतिम फीचर्स देखील देण्यात येतील.
फोटोग्राफीसाठी, या स्मार्टफोनच्या ट्रिपल रियर कॅमेरा युनिटमध्ये ऑप्टिकल इमेज स्टॅबिलायझेशन (OIS) सपोर्टसह 50MP चा Sony IMX890 प्रायमरी कॅमेरा आहे. फोनच्या फ्रंटमध्ये आकर्षक सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी 16MP कॅमेरा आहे. पॉवरसाठी, या फोनमध्ये 5,000 mAh बॅटरी मिळेल, जी 67W SuperVOOC चार्जिंगला सपोर्ट करेल.
Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile