Smartphones Summer Sale : Realmeच्या 5G फोनवर मिळतेय भारी सूट, स्वस्तात खरेदी करा महागडा फोन

Smartphones Summer Sale : Realmeच्या 5G फोनवर मिळतेय भारी सूट, स्वस्तात खरेदी करा महागडा फोन
HIGHLIGHTS

Realme Narzo 50 Pro 5G वर सूट

Amazon वर प्रचंड सवलत उपलब्ध आहे.

मिळतोय तब्बल 16 हजारांपर्यंत एक्सचेंज ऑफर

Amazon वर Smartphones Summer Sale सुरु झाला आहे. यादरम्यान तुम्हाला अनेक स्मार्टफोन्सवर सूट मिळेल. जर तुम्हाला Realme Narzo 50 Pro 5G कमी किंमतीत खरेदी करायचा असेल, तर आज आम्ही तुम्हाला एका शानदार ऑफरबद्दल सांगणार आहोत. चला तर मग बघुयात तुम्हाला हा फोन किती कमी किंमतीत खरेदी करता येईल.

हे सुद्धा वाचा : स्टायलिश लुकसह Hammerची नवी बजेट स्मार्टवॉच लाँच, किंमत फक्त 1,999 रुपये

किंमत आणि ऑफर्स 

या फोनच्या 6GB  रॅम आणि 128GB स्टोरेज वेरिएंटची किंमत 21,999 रुपये आहे. 21 टक्के डिस्काउंटसह 17,480 रुपयांना खरेदी करता येईल. EMI सह खरेदी करण्यासाठी, तुम्हाला दरमहा 835 रुपये द्यावे लागतील. येथून खरेदी करा

विशेष म्हणजे ICICI बँकेच्या क्रेडिट कार्डवरून पेमेंट केल्यास 10 % त्वरित सूट दिली जाईल. तर, HSBC कार्डवरून पेमेंट केल्यास 5 टक्के त्वरित सूट दिली जाईल. याशिवाय 16,000 रुपयांपर्यंतची एक्सचेंज ऑफरही दिली जात आहे. संपूर्ण लाभ मिळाल्यास तुम्हाला हा फोन फक्त 1,480 रुपयांमध्ये मिळेल.

Realme Narzo 50 Pro 5G

Realme Narzo 50 Pro 5G मध्ये 6.4-इंच लांबीचा FHD प्लस डिस्प्ले देखील देण्यात आला आहे. हा फोन Mediatek Dimensity 920 5G प्रोसेसरने सुसज्ज आहे. यात 6GB  रॅम आणि 128GBस्टोरेज आहे. त्याची स्टोरेज 256 GB पर्यंत वाढवता येते.  त्याचबरोबर फोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा देण्यात आला आहे. त्याचा पहिला सेन्सर 48MP, दुसरा 8MP आणि तिसरा 2MP आहे. फोनमध्ये 16MP फ्रंट कॅमेरा आहे. यासोबतच 5000mAh ची बॅटरी देण्यात आली आहे. हा फोन Android 12 वर काम करतो.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo